IND vs SL ODI Series: शेवटच्या सामन्यात भारतीय फलंदाजांच्या नावे झाला सर्वांत नकोसा विक्रम फिरकीपुढे टाकली नांगी..

0
3
 IND vs SL ODI Series: शेवटच्या सामन्यात भारतीय फलंदाजांच्या नावे झाला सर्वांत नकोसा विक्रम फिरकीपुढे टाकली नांगी..

 IND vs SL ODI Series: भारत आणि श्रीलंका यांच्यातील एकदिवसीय मालिका आता संपली आहे. या मालिकेतील शेवटचा सामना ७ ऑगस्ट रोजी खेळला गेला होता. या सामन्यातही टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला होता. या मालिकेत टीम इंडियाला 2-0 ने पराभवाला सामोरे जावे लागले होते. या मालिकेतील पराभवानंतर टीम इंडियाला मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले होते.

त्याचवेळी टीम इंडियाचे फलंदाज श्रीलंकेच्या फिरकी गोलंदाजांसमोर हतबल दिसत होते. या मालिकेत रोहित शर्माशिवाय इतर कोणताही फलंदाज विशेष काही करू शकला नाही. त्याचबरोबर या मालिकेत टीम इंडियाच्या नावावर एक लज्जास्पद विक्रमही नोंदवला गेला आहे.

'एखादी सिरीज गमावली म्हणून तुम्ही.." श्रीलंकेविरुद्धची सिरीज गमावल्यानंतर रोहित शर्माने केले मोठे वक्तव्य..

 IND vs SL ODI Series: टीम इंडियाने पहिल्यांदाच फिरकीविरुद्ध इतक्या विकेट्स गमावल्या,नकोशी कामगिरी झाली नावावर..!

एकदिवसीय मालिकेत श्रीलंकेच्या फिरकी गोलंदाजांचे वर्चस्व दिसून आले. फिरकी गोलंदाजांच्या फिरकीत भारताचे सर्व फलंदाज अडकताना दिसले. या मालिकेत टीम इंडियाने फिरकी गोलंदाजांसमोर २७ विकेट्स गमावल्या होत्या. टीम इंडियाने वनडे द्विपक्षीय मालिकेत कोणत्याही संघाच्या फिरकीपटूंविरुद्ध प्रथमच इतक्या विकेट्स गमावल्या आहेत.

या मालिकेतील तिसरा सामना 7 ऑगस्ट रोजी कोलंबोमध्ये खेळला गेला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने 50 षटकात 248 धावा केल्या होत्या आणि टीम इंडियासमोर विजयासाठी 249 धावांचे लक्ष्य ठेवले होते. 249 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना संपूर्ण भारतीय संघ 26.1 षटकात 138 धावांत गारद झाला.

 IND vs SL ODI Series: शेवटच्या सामन्यात भारतीय फलंदाजांच्या नावे झाला सर्वांत नकोसा विक्रम फिरकीपुढे टाकली नांगी..

पुन्हा एकदा भारतीय फलंदाजांनी चांगलीच निराशा केली. तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाचे 7 फलंदाज दुहेरी आकडाही गाठू शकले नाहीत. पुन्हा एकदा रोहित शर्माने संघाकडून सर्वाधिक धावा केल्या होत्या. या सामन्यात रोहितने 35 धावा केल्या.


हेही वाचा:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here