IND vs SL, Rohit Sharma bowling video: रोहित शर्माने गोलंदाजी करत केला अनोखा विक्रम, विराट कोहलीसह सर्वच जण करताहेत कौतुक, पहा व्हिडीओ..

0
5
IND vs SL, Rohit Sharma bowling video: रोहित शर्माने गोलंदाजी करत केला अनोखा विक्रम, विराट कोहलीसह सर्वच जण करताहेत कौतुक, पहा व्हिडीओ..

IND vs SL, Rohit Sharma bowling video: टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा त्याच्या तुफानी फलंदाजीसाठी ओळखला जातो, मात्र आज ( रविवार ४ ऑगस्ट) रोजी खेळवल्या जात असणाऱ्या  भारत विरुद्ध श्रीलंका (IND vs SL) दुसऱ्या एकदिवशीय सामन्यात गोलंदाजी करताना दिसला. श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात रोहितने शानदार फिरकी गोलंदाजी केली. या सामन्यात त्याला विकेट घेता आली नसली तरी तो किफायतशीर असल्याचे सिद्ध झाले. रोहितने दोन षटके टाकली. ज्यात त्याने 11 धावा दिल्या. यादरम्यान एक मोठा विक्रमही त्याने आपल्या नावे केला, नक्की कोणता आहेत तो विक्रम जाणून घेऊया सविस्तर..

IND vs SL, Rohit Sharma bowling video:
IND vs SL, Rohit Sharma bowling video:

IND vs SL, Rohit Sharma bowling video: रोहित शर्माला गोलंदाजी करतांना पाहून विराट कोहलीला आले हसू, चाहतेह करताहेत कौतुक..

भारतीय संघ क्षेत्ररक्षण करत असतांना कर्णधार रोहित शर्मा 39 वे षटक स्वतः टाकण्यास आला  ज्यात त्याने 6 धावा दिल्या. यानंतर रोहित 41 वे षटक टाकण्यासाठी परतला. ज्यात हिटमॅनने 5 धावा दिल्या. रोहितची फिरकी गोलंदाजी पाहून चाहते प्रभावित झाले. रोहितने या काळात दोन डॉट बॉल टाकले. रोहितची गोलंदाजी पाहून केवळ चाहतेच खुश झाले नाहीत तर विराट कोहलीही आनंदी दिसला. मैदानावर तो रोहितचा जोश वाढवतांना देखील दिसत होता..

IND vs SL: दुसऱ्या एकदिवशीय सामन्यात रोहित शर्माच्या नावे झाला हा विक्रम!

यासह रोहितने एक विक्रम आपल्या नावावर केला. 37 वर्षे आणि 96 दिवसांच्या वयात रोहित टीम इंडियासाठी वनडेमध्ये गोलंदाजी करणारा तिसरा सर्वात वयस्कर फिरकी गोलंदाज ठरला आहे. या बाबतीत तो रविचंद्रन अश्विनच्या पुढे गेला. अश्विनने वयाच्या 37 वर्षे 21 दिवसांत हा विक्रम आपल्या नावावर केला होता. या यादीत सचिन तेंडुलकर ३८ वर्षे ३२९ दिवसांसह अव्वल स्थानावर असून श्रीनिवासराघवन वेंकटराघवन ३७ वर्षे ३५१ दिवसांसह अव्वल स्थानावर आहे.

IND vs SL:जवळपास 9 महिन्यांनंतर एकदिवसीय सामन्यात केली रोहितने गोलंदाजी!

रोहित शेवटचा 9 महिन्यांपूर्वी एकदिवसीय सामन्यात गोलंदाजी करताना दिसला होता. त्याने 12 नोव्हेंबर 2023 रोजी बेंगळुरू येथे नेदरलँड्सविरुद्ध गोलंदाजी केली. यादरम्यान रोहितने 5 चेंडू टाकले आणि एक विकेट घेतली. एकदिवसीय सामन्यात रोहितच्या गोलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर, त्याने 40 सामन्यांच्या 264 डावात 9 विकेट घेतल्या आहेत. याआधी रोहितने कसोटीतही गोलंदाजी केली आहे. त्याने 2 विकेट घेतल्या आहेत. T-20 मध्ये त्याच्या नावावर एक विकेट आहे.

IND vs SL, Rohit Sharma bowling video: रोहित शर्माने गोलंदाजी करत केला अनोखा विक्रम, विराट कोहलीसह सर्वच जण करताहेत कौतुक, पहा व्हिडीओ..
रोहित शर्माच्या आधी या मालिकेत  शुभमन गिलही (Shubhman Gill) पहिल्या सामन्यात गोलंदाजी करताना दिसला होता. टी-२० मालिकेतील शेवटच्या सामन्यात सूर्यकुमार यादव आणि रिंकू सिंग यांनी शानदार गोलंदाजी करत सामना जिंकला होता. या फलंदाजांच्या गोलंदाजीमुळे टीम इंडिया पूर्वीपेक्षा मजबूत झाली आहे. याचे श्रेय मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांना दिले जात आहे. ज्यांना प्रत्येक कार्यसंघ सदस्याने प्रत्येक क्षेत्रात योगदान द्यावे असे वाटते.


हेही वाचा:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here