ind vs sl Rohit sharma injured: टीम इंडिया सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. दोन्ही देशांमध्ये 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका (IND vs SL ODI Series) खेळवली जात आहे. मालिकेतील पहिला सामना बरोबरीत सुटला होता, तर दुसरा सामना श्रीलंकेने 32 धावांनी जिंकला होता. आता मालिका वाचवण्यासाठी भारताला अंतिम सामना कोणत्याही किंमतीवर जिंकावा लागेल. मात्र यादरम्यान टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे. कर्णधार रोहित शर्मा दुखापतग्रस्त (ind vs sl Rohit sharma injured) असल्याने मंगळवारी सराव सत्रात सहभागी झाला नाही. अशा स्थितीमध्ये भारताला हा सामना जिंकणे आता कठीण दिसत आहे.
ind vs sl Rohit Sharma injured: दुसऱ्या सामन्यादरम्यान रोहित शर्मा जखमी!
टीम इंडिया मंगळवारी दुपारी 12 वाजता सराव सत्रासाठी पोहोचली. विराट कोहलीसह टीम इंडियाच्या सर्व फलंदाजांनी नेटमध्ये घाम गाळला, मात्र यावेळी कर्णधार रोहित शर्मा मैदानावर फिरताना दिसला. त्याने एकही षटक फलंदाजी केली नाही. एवढेच नाही तर क्षेत्ररक्षण सत्रातही तो सहभागी झाला नाही.दुसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान रोहितला उजव्या पायाच्या मांडीत काही समस्या निर्माण झाली होती, जी अजूनही कायम आहे. त्यामुळे सावधगिरीने हिटमॅनने सराव सत्रात भाग घेतला नाही.
रविवारी दुसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान फलंदाजी करताना रोहित थोडासा दुखी दिसला होता… तेव्हा शर्माला फलंदाजी करताना उजव्या पायात समस्या येत होती. यानंतर रोहित जास्त वेळ क्रीजवर राहू शकला नाही आणि पुढच्याच षटकात तो बाद झाला. त्याने 44 चेंडूत 5 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 64 धावांची तुफानी खेळी केली.
रोहित शर्मा चांगल्या फॉर्ममध्ये !
रोहित शर्मा सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात त्याने 47 चेंडूत 7 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 58 धावा केल्या होत्या. मात्र असे असतानाही भारतीय फलंदाजीच्या मधल्या फळीला 231 धावांचे लक्ष्य गाठता आले नाही. दुसऱ्या वनडेतही असेच दृश्य पाहायला मिळाले. अशा परिस्थितीत रोहित तिसरा वनडे खेळला नाही तर टीम इंडियाला विजयाची अपेक्षा करणे कठीण होईल.
हेही वाचा: