IND vs SL: पहिला सामना रद्द झाल्यावर निराश झाला रोहित शर्मा, केले मोठे वक्तव्य..!

0
4
IND vs SL: पहिला सामना रद्द झाल्यावर निराश झाला रोहित शर्मा, केले मोठे वक्तव्य..!

IND vs SL : टीम इंडियाला शुक्रवारी श्रीलंकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात बरोबरीवर समाधान मानावे लागले. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेच्या संघाने टीम इंडियाला 230 धावांचे आव्हान देत 231 धावांचे लक्ष्य दिले होते, परंतु भारतीय संघ 47.5 षटकांत केवळ 230 धावांवरच गारद झाला. त्यामुळे सामना बरोबरीत सुटला.

मात्र या सामन्यात भारतीय संघाची गोलंदाजी चांगली होती. शिवाय भारतीय संघातील फलंदाजानीही चांगली सुरुवात केली. पहिली विकेट 75 धावांवर पडली. यानंतर एकामागून एक विकेट पडत राहिल्या. आठव्या क्रमांकावर आलेल्या शिवम दुबेने मोहम्मद सिराजच्या साथीने कशीतरी फलंदाजी करत संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नेले, मात्र धावसंख्या बरोबरीत आणल्यानंतर दुबे एलबीडब्ल्यू होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर अर्शदीप सिंगही बाद झाला. अशा प्रकारे हा सामना अनिर्णित राहिला. हा सामना टाय झाल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा भारतीय संघाच्या फलंदाजीबाबत निराश दिसला.

India vs Sri Lanka 1st ODI: पहिला सामना टाय झाल्यानंतर सुपर ओव्हर का घेण्यात आली नाही? काय सांगतो आयसीसीचा नियम?

IND vs SL : पहिला सामना रद्द झाल्यानंतर काय म्हणाला कर्णधार रोहित शर्मा?

पहिला एकदिवशीय सामना रद्द झाल्यानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्मा म्हणाला,  “लक्ष्य साध्य करता येतात, पण त्यासाठी चांगली फलंदाजी आवश्यक असते. आम्ही पॅचमध्ये चांगली फलंदाजी केली. आमची लय नव्हती.  शिवाय आमची सुरुवात चांगली झाली होती, पण स्पिन आल्यावर खेळ बदलायला सुरुवात होईल हे माहीत होतं. आम्हाला माहित होते की फिरकीपटू आल्यानंतर आणि 10 षटकांनंतर खेळ सुरू होईल.”

1 धाव काढू न शकल्याने नक्कीच निराश आहे- कर्णधार रोहित शर्मा

  रोहित पुढे म्हणाला,अक्षर पटेल आणि केएल राहुल यांच्यातील भागीदारीद्वारे आम्ही पुनरागमन केले, परंतु शेवटच्या 14 चेंडूंमध्ये 1 धावही न मिळाल्याने मी निराश झालो आहे. आता मी जास्त बोलणार नाही. तथापि, हा असा खेळ नव्हता जिथे आपण आपले स्वत: चे सिग्नेचर  शॉट्स खेळू शकता. तुम्हाला फक्त स्वतःची तयारी करायची होती आणि धीर धरायचा होता. तरीही आम्ही ज्या पद्धतीने लढलो त्याचा आम्हाला अभिमान आहे.

खेळपट्टीच्या प्रश्नावर रोहित म्हणाला , ही खेळपट्टी आम्ही जशी विचार केली होती तशीच होती. आम्ही गोलंदाजी केली तेव्हा पहिल्या 25 षटकांमध्ये आम्ही चेंडू धरला. त्याचीही तीच परिस्थिती होती. जसजसा खेळ पुढे सरकत गेला तसतशी दोन्ही संघांची शिवण पातळ होत गेली. यानंतर फलंदाजी थोडी सोपी झाली.

सामना रद्द झाल्यावर  काय म्हणाला श्रीलंकेचा कर्णधार?

या सामन्यानंतर श्रीलंकेचा कर्णधार चारिथ असालंका यानेही निवेदन दिले. तो म्हणाला, आम्हाला वाटले की 230 धावा पुरेशा आहेत. आम्ही आणखी चांगली कामगिरी करायला हवी होती. या खेळपट्टीवर गोलंदाजी करणे सोपे नव्हते. दुपारनंतर चेंडू फिरत होता. असलंकाने ड्युनिथ वेलालगे आणि पाथुम निसांकाच्या फलंदाजीचे कौतुक केले.

IND vs SL: पहिला सामना रद्द झाल्यावर निराश झाला रोहित शर्मा, केले मोठे वक्तव्य..!

या सामन्यात टीम इंडियाची फलंदाजी फ्लॉप ठरली. शुभमन गिल १६ धावांवर बाद झाल्यानंतर रोहित ५८ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. विराट कोहलीनेही निराश केले. त्याने 32 चेंडूत 24 धावा केल्या. वॉशिंग्टन सुंदर 5, श्रेयस अय्यर 23, केएल राहुल 31, अक्षर पटेल 33 आणि कुलदीप यादव 2 धावा करून बाद झाले. शिवम दुबेने शेवटपर्यंत झुंज दिली. त्याने 24 चेंडूत 1 चौकार आणि 2 षटकार लगावत 25 धावा केल्या. मोहम्मद सिराजने 11 चेंडूत 5 धावा केल्यानंतर नाबाद राहिला. तर अर्शदीप सिंग एकही धाव न काढता बाद झाला. अर्शदीपने एक धाव घेतली असती तर ,टीम इंडियाचा विजय झाला असता, पण तसे होऊ शकले नाही.


हेही वाचा:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here