IND vs ZIM live: नंफेक जिंकून शुभमन गिलने घेतला फलंदाजीचा निर्णय, भारतीय संघामध्ये 3 मोठे बदल, पहा दोन्ही संघाची प्लेईंग 11

0

IND vs ZIM: भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात 5 T20 सामन्यांची मालिका खेळली जात आहे. आतापर्यंत 2 सामने खेळले गेले आहेत. यामध्ये झिम्बाब्वेने एक सामना तर भारताने दुसरा सामना जिंकला आहे. मालिकेतील तिसरा सामना आज होणार आहे. मालिकेत आघाडी घेण्यासाठी दोन्ही संघांना हा सामना जिंकायचा आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारताचे युवा खेळाडू आपली ताकद दाखवण्यासाठी सज्ज आहेत. त्याचबरोबर झिम्बाब्वेचे खेळाडूही कर्णधार सिकंदर रझाच्या नेतृत्वाखाली चांगली कामगिरी करत आहेत.

IND vs ZIM live: खेळपट्टीचा अहवाल कसा आहे? (IND vs ZIM Pitch Report)

हरारे स्पोर्ट्स क्लबच्या मैदानावर खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या टी-२० सामन्यातील खेळपट्टी थोडी वेगळी करण्यात आली आहे. गेल्या दोन सामन्यांच्या तुलनेत यावेळी खेळपट्टीवर गवत कमी आहे आणि काही भेगाही आहेत.  यावरूनविकेट पूर्णपणे कोरडी असल्याचे स्पष्ट झाले आहे. आणि जर सूर्य बाहेर पडला तर दुसऱ्या डावात धावा काढणे कठीण होईल. मैदानावर 160 धावा ही विजयी धावसंख्या ठरू शकते.

IND vs ZIM live: झिम्बाब्वे संघात २ बदल

झिम्बाब्वे संघाने आपल्या प्लेइंग-11 मध्ये 2 बदल केले आहेत. कॅप्टन सिकंदर रझा यांनी सांगितले की, इनोसेंट कैया जखमी झाला आहे. त्याच्या जागी तडिवनाशे मारुमणीचा प्लेइंग-11 मध्ये समावेश करण्यात आला आहे. तर ल्यूक जोंगवेच्या जागी रिचर्ड नगारवाचा प्लेईंग-11 मध्ये समावेश करण्यात आला आहे.

IND vs ZIM live: असा आहे झिम्बाब्वेचा अंतिम 11 जणांचा संघ

सिकंदर रझा (कर्णधार), तदिवनाशे मारुमणी, वेस्ली मादवेरे, ब्रायन बेनेट, डायन मायर्स, जोनाथन कॅम्पबेल, क्लाइव्ह मदांडे (विकेटकीपर), वेलिंग्टन मसाकादझा, रिचर्ड नगारवा, ब्लेसिंग मुझाराबानी आणि तेंडाई चतारा.

IND vs ZIM live: भारताच्या प्लेइंग-11 मध्येही बदल

भारतीय संघाच्या प्लेइंग-11 मध्ये बदल करण्यात आला आहे. वेगवान गोलंदाज मुकेश कुमारच्या जागी खलील अहमदचा प्लेइंग-11 मध्ये समावेश करण्यात आला आहे. याशिवाय विश्वचषक संघातील यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन आणि शिवम दुबे यांचा प्लेइंग-11 मध्ये समावेश करण्यात आला आहे.

IND vs ZIM live: थोड्याच वेळात सामन्यात सुरवात भारतीय संघामध्ये 3 मोठे बदल, पहा दोन्ही संघाची प्लेईंग 11

IND vs ZIM live: असा आहे भारताचा  अंतिम 11 जणांचा संघ

शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, अभिषेक शर्मा, रुतुराज गायकवाड, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, आवेश खान आणि खलील अहमद.


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

 

Leave A Reply

Your email address will not be published.