बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी कसोटी मालिकेतील चौथा सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर सुरू आहे. या सामन्यात भारतीय संघाने पहिल्या डावात ५७१ धावांची मोठी मजल मारली. आता चार दिवसांचा खेळ संपला आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलचं तिकीट मिळवण्यासाठी भारतीय संघासाठी हा सामना जिंकणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे कर्णधार रोहित शर्माने एक खास प्लॅन बनवला आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात भारतीय संघाने ५८१ धावांचा डोंगर उभारला आहे. त्यामुळे भारताला ९१ धावांची आघाडी मिळाली आहे. पाहुण्या ऑस्ट्रेलिया संघाने पहिल्या डावात ४८० धावा केल्या. तर भारतीय संघाकडून धडाकेबाज फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहलीने १८६ तर अक्षर पटेलने ७९ धावांची खेळी केली.
तर सलामीवीर फलंदाज शुभमन गिलने तिसऱ्या दिवशीच १२८ धावांची खेळी केली होती. ऑस्ट्रेलियाकडून ऑफ स्पिनर टॉड मर्फी आणि नॅथन लायन यांनी ३-३ बळी घेतले.

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आता एक खास प्लॅन अखणार आहे, जेणेकरून ५ व्या दिवशी फासे फिरवता येतील. आता ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव किती षटकात संपतो हे पूर्णपणे गोलंदाजांवर अवलंबून आहे. जर टीम इंडियाला सामना जिंकायचा असेल तर ५ व्या दिवशी सकाळच्या सत्रातच ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का द्यावा लागेल. सत्रातच पाहुण्या संघाचा दुसरा डाव स्वस्तात निपटला, तर भारतासाठी विजयाचा मार्ग मोकळा होईल. हा सामना जिंकल्यानंतर टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलचे तिकीटही मिळणार आहे.