India vs Australia 1st ODI: पहिल्याच सामन्यात टीम इंडियाने रचला इतिहास, गिल-शमीने मोडले हे 5 मोठे विक्रम…

India vs Australia 1st ODI: पहिल्याच सामन्यात टीम इंडियाने रचला इतिहास, गिल-शमीने मोडले हे 5 मोठे विक्रम…


India vs Australia 1st ODI Records: मोहाली येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाने ऐतिहासिक विजय नोंदवला आहे. या विजयासह भारतीय संघाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली नाही तर एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वांत वरचा संघ ठरला. या क्रमवारीत भारतीय संघ सध्या नंबर 1 वर पोहचला आहे.. याशिवाय या सामन्यात सरस कामगिरी करणाऱ्या मोहम्मद शमी (Mohmmad Shami) आणि शुभमन गिलनेही (Shubhman Gill) अनेक मोठे विक्रम केले.

India vs Australia

IND vs AUS: आज ऑस्ट्रोलियाचा पराभव करताच टीम इंडिया रचणार इतिहास, सर्वच फोर्मेटमध्ये नंबर 1 होण्याची टीम इंडियाला संधी..

India vs Australia 1st ODI:  पहिल्याच सामन्यात  हे 5 विक्रम रचले गेले.

१. भारत आणि ऑस्ट्रोलिया यांच्यात खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवशीय सामन्यात मोहम्मद शमीने (Mohmmad Shami) सामन्यात 5 विकेट घेतल्या. भारतीय भूमीवर अशी कामगिरी करणारा तो १६ वर्षांतील पहिला गोलंदाज ठरला आहे.

२.शुभमन गिलने (Shubhman Gill) या सामन्यात ७४ धावांची खेळी करत अनेक मोठे विक्रम आपल्या नावावर केले. गिलने एकदिवसीय क्रिकेटच्या पहिल्या 30 डावांमध्ये 50 प्लस 13 वेळा धावसंख्या गाठली आहे, त्यामुळे या बाबतीत त्याने 12 वेळा हा पराक्रम करणाऱ्या सचिन तेंडुलकरला (Sachin Tandulkar) मागे टाकले आहे.

3.रोहित शर्मानंतर 2023 मध्ये सर्वाधिक षटकार मारणारा गिल (Shubhman Gill) हा दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. त्याने आतापर्यंत 42 षटकार मारले आहेत. तर रोहितने 43 षटकार मारले आहेत. या स्थितीत गिल सध्या फक्त एका षटकार पासून रोहितच्या मागे आहे आणि ऑस्ट्रोलियाविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यामध्ये गिल हा षटकार ठोकून रोहित ला मागे सोडू शकतो.

IND vs AUS: आज ऑस्ट्रोलियाचा पराभव करताच टीम इंडिया रचणार इतिहास, सर्वच फोर्मेटमध्ये नंबर 1 होण्याची टीम इंडियाला संधी..

४.मोहालीत 27 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाचा ‘हा’ पहिला पराभव असून भारताने 1996 पासून मोहालीतील पराभवाचा दुष्काळ संपवला आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने 276 धावा केल्या ज्यात डेव्हिड वॉर्नरने 52 धावांची खेळी केली. प्रत्युत्तरात भारताने हे लक्ष्य ५ विकेट्सच्या मोबदल्यात सहज गाठले आणि सिरीज मध्ये 1-0 अशी आघाडी घेतली.


हेही वाचा:

ODI वर्ल्डकप 2023 नंतर टीम इंडियातील ‘हे’ 3 स्टार खेळाडू होऊ शकतात निवृत्त, स्वतः दिग्गज खेळाडूने दिले संकेत..

शुभमन गिल सारा पुन्हा पडले एकमेकांच्या प्रेमात?.. ब्रेकअप नंतर दोघेही पुन्हा एकत्र, फोटो व्हायरल..

टेलेंट असूनही या 4 खेळाडूंना कधीही संघात जागा मिळाली नाही, एकाने तर केले होते जबरदस्त प्रदर्शन तरीही केवळ 2 वर्षचं टिकली क्रिकेट कारकीर्द..

ODI वर्ल्डकप 2023 नंतर टीम इंडियातील ‘हे’ 3 स्टार खेळाडू होऊ शकतात निवृत्त, स्वतः दिग्गज खेळाडूने दिले संकेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *