India vs Australia, 2nd ODI:दुसरा एकदिवशीय सामना आज, टीम इंडियाचे सिरीज जिंकण्यावर लक्ष, असी असू शकते दोन्ही संघांची प्लेईग 11
India vs Australia, 2nd ODI: भारताने पहिला सामना 5 गडी राखून जिंकून ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या 3 सामन्यांच्या वनडे मालिकेची शानदार सुरुवात केली. आता दोन्ही संघांमधील या मालिकेतील दुसरा सामना आज (24 सप्टेंबर) रोजी होळकर क्रिकेट स्टेडियम, इंदोर येथे होणार आहे. हा सामना जिंकून टीम इंडियाला मालिकेत अजेय आघाडी घेण्याची संधी असेल. मोहाली एकदिवसीय सामन्यात गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्ही विभागात भारताकडून चांगली कामगिरी झाली.
एकदिवसीय विश्वचषक 2023 लक्षात घेऊन, दोन्ही संघ या सामन्यासाठी त्यांच्या प्लेइंग 11 मध्ये काही मोठे बदल करू शकतात. या सामन्यात भारताला पहिल्या सामन्यात बाद झालेल्या मोहम्मद सिराजचे पुनरागमन होऊ शकते, ज्याला जसप्रीत बुमराहच्या जागी स्थान मिळू शकते.

मोहाली एकदिवसीय सामन्यात मोहम्मद शमीने टीम इंडियासाठी गोलंदाजीत 5 विकेट घेत आपल्या कामगिरीने सर्वांना प्रभावित केले. अशा स्थितीत विश्वचषकापूर्वी त्याचा फॉर्म लक्षात घेता त्याला संघाबाहेर ठेवणे सोपे नाही. ऑस्ट्रेलियाबद्दल बोलायचे तर मोहाली वनडेत फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही विभागात संघाने निराशा केली.
इंदोरच्या होळकर स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या या दुसऱ्या सामन्याच्या खेळपट्टीबद्दल बोलायचे झाले तर, येथे फलंदाजी करणे सोपे मानले जाते. अशा परिस्थितीत, नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो जेणेकरून लक्ष्याचा सहज पाठलाग करता येईल. आतापर्यंत 6 एकदिवसीय सामन्यांमध्ये पहिल्या डावाची सरासरी 320 धावा आहे.
असे असू शकतात दोन्ही संघ.
भारत – शुभमन गिल, रुतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, केएल राहुल (कर्णधार, यष्टिरक्षक), इशान किशन, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.
ऑस्ट्रेलिया – डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लॅबुशेन, कॅमेरॉन ग्रीन, अॅलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), मार्कस स्टॉइनिस, शॉन अॅबॉट, पॅट कमिन्स (कर्णधार), जोश हेझलवूड, अॅडम झाम्पा.
हेही वाचा:
शुभमन गिल सारा पुन्हा पडले एकमेकांच्या प्रेमात?.. ब्रेकअप नंतर दोघेही पुन्हा एकत्र, फोटो व्हायरल..