T20 World Cup 2024: भारत-पाकिस्तान सामन्याबाबत या दिग्गज खेळाडूचे मोठे विधान.

Cricket 3

 

क्रिकेट हा आपल्या देशातील बहुतांशी लोकांचा आवडा खेळ आहे त्यात सर्वात महत्वाचे म्हणजे भारत आणि पाकिस्तान सामना. भारत पाकिस्तान हा सर्वात रोमांचक सामना असतो त्यामुळे प्रत्येक क्रिकेट प्रेमीचा हा आवडता सामना असतो. आता जून पासून सुरू होणाऱ्या टी 20 वर्ल्ड कप ची सर्वानाच आतुरता लागली आहे. त्यामुळे सर्वच क्रिकेटप्रेमी जून महिन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.

Cricket 3

 

सध्या भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघामध्ये टेस्ट सिरीज चे सामने सुरू आहेत. तसेच टेस्ट सिरीज चा शेवटचा सामना हा धर्मशाला येथील ग्राउंड वर खेळाला जाणार आहे. त्या नंतर लगेच भारतात आयपीएल चे सामने सुरू होणार आहेत त्यामुळे फॅन्स मध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

 

 

 

ख्रिस गेल ला भारत पाकिस्तान सामन्याची आतुरता:-

ख्रिस गेल हा भारतीय किंवा पाकिस्तानी खेळाडू नाही तरी सुद्धा ख्रिस गेलं ला या दोन्ही देशातील सामना पाहण्याची जबरदस्त आतुरता लागली आहे. दोन्ही संघमध्ये नेहमीच जोरदार लढत होत असते ते सर्वानाच माहीत आहे.

 

भारत-पाकिस्तान या दोन्ही संघात शेवटचा सामना हा २०२३ मध्ये झाला होता. दोन्ही देशांमध्ये हा सामना एकदिवसीय विश्वचषकात झाला होता. या सामन्यात भारतीय क्रिकेट संघाने पाकिस्तान क्रिकेट संघाला धूळ चारत विजय मिळवला होता. आता पुन्हा एकदा T20 विश्वचषक 2024 मध्ये भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघामध्ये मोठा सामना होणार आहे.

 

 

तसेच AFP या न्युज चॅनलवर बोलताना ख्रिस गेल म्हंटला की, भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना खूप रोमांचक होणार आहे. गेल्या वर्षी अमेरिकेत टी-20 स्पर्धा आयोजित करण्यात आली होती आणि ती यशस्वी ठरली होती. परंतु आताचा सामना हा भारताकडे राहील अशी आशा आहे.

 

 कोठे होणार हा सामना:-

टी-20 वर्ल्ड कप 2024 मध्ये टीम इंडिया आणि पाकिस्तान या दोन्ही संघामधील हा सामना 9 जून रोजी होणार आहे. तसेच हा सामना न्यूयॉर्कच्या स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे. त्याचबरोबर या मैदानावर टीम इंडिया पाकिस्तानशिवाय आयर्लंड आणि अमेरिका हे संघ सुद्धा सामने खेळणार आहेत.

 

==

 

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

 

हे ही वाचा:- IPL 2024: आयपीएलचे हे आहेत 5 अतूट विक्रम, जे मोडणे अवघडच नाही तर अशक्य आहे.

 

 

 

हे ही वाचा:- BCCI Annual Contract: बीसीसीआई ने या 5 दिग्गज खेळाडूंना कॉन्ट्रॅक्ट मधून वगळले, क्रिकेट करियर वर लागू शकतो कायमचा ब्रेक.

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *