India vs South Africa 1st T20: पहिला सामना पावसामुळे रद्द, आता या दिवशी पुन्हा भिडणार भारत आणि दक्षिण आफ्रिका…

0
23
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

India vs South Africa 1st T20: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील मालिकेतील पहिला T20 सामना पाऊस आणि खराब हवामानामुळे कोणताही चेंडू न टाकता रद्द करण्यात आला. रविवारी होणाऱ्या या सामन्याची क्रिकेट चाहते आतुरतेने वाट पाहत होते, मात्र त्यांच्या पदरी निराशाच पडली.

भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यातील 3 सामन्यांची टी-20 मालिका रविवारपासून सुरू होणार होती. हा सामना पाहण्यासाठी चाहते डर्बनच्या स्टेडियममध्ये उपस्थित होते पण पावसाने सर्वांची निराशा केली. या मालिकेसाठी टीम इंडियाचे कर्णधारपद मजबूत फलंदाज सूर्यकुमार यादवकडे आहे. दरम्यान, एडन मार्कराम दक्षिण आफ्रिकेच्या संघाचे नेतृत्व करत आहे.

Harmanpreet Kaur Angry on Team: मालिका गमावल्यानंतर सहकाऱ्यांवर भडकली कर्णधार हरमन प्रीत कौर, या खेळाडूना ठरवले जिम्मेदार..

या सामन्यासाठी नाणेफेक भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता होणार होती. जवळपास अडीच तास उलटून गेले तरी किंग्समीड स्टेडियममधील चाहत्यांसाठी कोणतीही दिलासादायक बातमी आली नाही.

India vs South Africa 1st T20: पहिला सामना पावसामुळे रद्द, आता या दिवशी पुन्हा भिडणार भारत आणि दक्षिण आफ्रिका...

पावसाची संततधार सुरूच होती. दरम्यान, प्रेक्षक आपल्या छत्री किंवा रेनकोटच्या मदतीने अपेक्षेने बसले होते. पंच छत्री धरून मैदानावर चालतानाही दिसले. त्यांच्यासोबत ग्राउंड स्टाफचे सदस्यही होते. नंतर सामना अधिकाऱ्यांनी तो रद्द करण्याचा निर्णय घेतला.

आता क्रिकेटप्रेमींना मंगळवार 12 डिसेंबरची प्रतीक्षा आहे. मालिकेतील दुसरा टी-20 सामना 12 डिसेंबर रोजी गकेबेरहा येथे होणार आहे. तिसरा T20 सामना जोहान्सबर्गच्या न्यू वांडरर्स स्टेडियमवर गुरुवारी 14 डिसेंबर रोजी खेळवला जाईल. त्यानंतर 17 डिसेंबरपासून 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका होणार आहे.

India vs South Africa 1st T20: पहिला सामना पावसामुळे रद्द, आता या दिवशी पुन्हा भिडणार भारत आणि दक्षिण आफ्रिका...

India vs South Africa 1st T20: गिल-जडेजा उशिरा संघासोबत जोडले गेले.

या मालिकेसाठी संघाचा कर्णधार सूर्यकुमारसह बहुतांश खेळाडू आधीच डर्बनला पोहोचले होते. शुभमन गिल आणि उपकर्णधार रवींद्र जडेजा शेवटचे पोहोचले. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय विश्वचषकाच्या फायनलनंतर दोघेही परदेशात सुट्टीवर गेले होते. नंतर दोघेही थेट डर्बनला पोहोचले. गिल आणि जडेजा नंतर सराव सत्रात सहभागी झाले.


हेही वाचा:

शुभमन गिल सारा पुन्हा पडले एकमेकांच्या प्रेमात?.. ब्रेकअप नंतर दोघेही पुन्हा एकत्र, फोटो व्हायरल..

टेलेंट असूनही या 4 खेळाडूंना कधीही संघात जागा मिळाली नाही, एकाने तर केले होते जबरदस्त प्रदर्शन तरीही केवळ 2 वर्षचं टिकली क्रिकेट कारकीर्द..

ODI वर्ल्डकप 2023 नंतर टीम इंडियातील ‘हे’ 3 स्टार खेळाडू होऊ शकतात निवृत्त, स्वतः दिग्गज खेळाडूने दिले संकेत