आयपीएल मध्ये सर्वाधिक चेंडू निर्धाव टाकण्यामध्ये भारतीय गोलंदाज आघाडीवर: पहा कोण आहे पहिल्या क्रमांकावर?

आयपीएल मध्ये सर्वाधिक चेंडू निर्धाव टाकण्यामध्ये भारतीय गोलंदाज आघाडीवर: पहा कोण आहे पहिल्या क्रमांकावर?

ताज्या बातम्या आणि अपडेट्स Whattsapp वर मिळवण्यासाठी जॉईन करा: Whatsapp Group

=======

IPL Most Dot Ball: क्रिकेट हा असा खेळ आहे तिथे प्रत्येक क्षणाला काय होईल हे सांगता येत नाही. एखादा खेळाडू सामन्यात शतक मारून हिरो ठरतो तर पुढच्या सामन्यात तो झिरोवर बाद होऊन खलनायक ठरतो. त्यामुळे कोणतेच भाकीत करता येत नाही. आज आम्ही आपल्याला आयपीएल मध्ये सर्वाधिक डॉट चेंडू टाकणाऱ्या खेळाडूंची माहिती देणार आहोत.

आयपीएलच्या इतिहासात या गोलंदाजांनी टाकलेत सर्वांत जास्त डॉट बॉल.

१. भुवनेश्वर कुमार

आयपीएल मध्ये सर्वाधिक चेंडू निर्धाव टाकण्यामध्ये भारतीय गोलंदाज आघाडीवर: पहा कोण आहे पहिल्या क्रमांकावर

नकल बॉल टाकण्यात माहीर असलेला सनरायझर्स हैदराबादचा मध्यमगती वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार याची गोलंदाजी खेळणे फार अवघड काम आहे. आयपीएल मध्ये त्याच्या नावावर सर्वाधिक डॉट चेंडू टाकण्याचा विक्रम आहे. भुवनेश्वर कुमारने सर्वाधिक डॉट चेंडू टाकले आहेत. त्याने आयपीएलच्या 160 सामन्यात 1534 चेंडू निर्धाव टाकले आहेत.

२. सुनील नरेन

आयपीएल मध्ये सर्वाधिक चेंडू निर्धाव टाकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सुनील नरेन हा दुसऱ्या स्थानावर आहे. सुनील नरेन आयपीएल मध्ये 162 सामन्यात 1479 चेंडू डॉट बॉल टाकले आहेत. आयपीएल मधला तो सर्वाधिक कंजूस गोलंदाज मानला जातो. त्याच्या ॲक्शनमुळे फलंदाजास गोलंदाजी खेळणे अवघड जाते.

३.आर अश्विन

आर अश्विनने आयपीएलमध्ये विविध संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. चेन्नई सुपर किंग्स संघाकडून त्याने सर्वाधिक सामने खेळले आहेत. सध्या तो किंग्स इलेव्हन पंजाब संघाचा सदस्य आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फक्त तो कसोटी खेळतोय. आयपीएल त्याने 1477 चेंडू निर्धाव टाकले आहेत.

IND vs ENG: आर अश्विन म्हणजे शंभर नंबरी सोनं; क्रिकेटच्या 147 वर्षात अशी कामगिरी करणारा बनला पहिला गोलंदाज!

४.पियुष चावला

लेग स्पिनर पियुष चावला याने 1272 चेंडू निर्धाव टाकले आहेत. आयपीएल मध्ये धडाकेबाज कामगिरी करणाऱ्या या खेळाडूला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपली छाप सोडता आली नाही. वयाच्या 19 व्या वर्षी त्याने सचिन तेंडुलकरला आपल्या गुगली चेंडूने बाद करून खूपच प्रसिद्धी मिळवली होती. त्यानंतर भारताच्या राष्ट्रीय संघात त्याला संधी मिळाली होती.

५. हरभजन सिंग

भारताचा ऑफ स्पिनर हरभजन सिंग याने आयपीएल मध्ये 1268 चेंडू डॉट टाकले होते. अशी कामगिरी करणारा तो पाचवा गोलंदाज बनला आहे. हरभजनने आयपीएल मध्ये सीएसके, मुंबई इंडियन्स केकेआर च्या संघाकडून क्रिकेट खेळला होता.

६.अमित मिश्रा

लेग स्पिनर अमित मिश्रा याने ११८६ चेंडू डॉट टाकले आहेत. आयपीएल मध्ये हॅट्रिक घेण्याची किमया देखील त्याने केली होती. डेक्कन चार्जेस, दिल्ली कॅपिटल्स आणि आरसीबीच्या संघाकडून तो आयपीएलमध्ये खेळला आहे. आयपीएल आणि स्थानिक क्रिकेटमध्ये भरभरून विकेट घेणाऱ्या या खेळाडूला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फारशी संधी भेटली नाही.

आयपीएल मध्ये सर्वाधिक चेंडू निर्धाव टाकण्यामध्ये भारतीय गोलंदाज आघाडीवर: पहा कोण आहे पहिल्या क्रमांकावर?

७.रवींद्र जडेजा

डाव्या हाताने गोलंदाजी करणारा ऑफ स्पिनर रवींद्र जडेजा याने 1159 चेंडू निर्धाव टाकले आहेत. जडडूची गोलंदाजी खेळून काढणे हे फलंदाजासाठी नेहमीच एक आव्हानात्मक काम ठरले आहे.

८.लसिथ मलिंगा

यॉर्कर किंग लसिथ मलिंगा याने आयपीएल मध्ये 1155 चेंडू निर्धाव टाकले आहेत. आयपीएल मध्ये त्याने मुंबई इंडियन्स संघाचे प्रतिनिधित्व केले होते.

९.उमेश यादव

केकेआर संघाचा खेळाडू उमेश यादव यांनी आयपीएल मध्ये 1147 चेंडू डॉट टाकले आहेत. उमेशने दिल्ली कॅपिटल्स, केकेआर आणि आरसीबीच्या संघाकडून आयपीएल मध्ये खेळला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Yuzvendra Chahal (@yuzi_chahal23)

10.युजवेंद्र चहल

फिरकीपटू युजवेंद्र चहल याने देखील आयपीएलमध्ये 1129 चेंडू निर्धाव टाकले होते. चहल सध्या राजस्थान रॉयल्सचे प्रतिनिधित्व करतो.


==

आमचे ईतर लेख आणि ट्रेंडीग बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *