- Advertisement -

रोहित- विराट, हार्दिक नाही, सर्फराज अहमद या खेळाडूला मानतो भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार, त्यामुळेच आज विराट, रोहित सारखे खेळाडू चमकले.

0 0

 

 

 

आपल्या देशातील सर्वाधिक लोकांचा आवडता खेळ हा क्रिकेट आहे. अगदी लहान मुलापासून ते वयोवृद्ध लोकांपर्यंत प्रत्येकाला क्रिकेट चे वेड आहे. आपल्या भारतीय संघामध्ये अनेक दिग्गज खेळाडू आहेत जे की जगभर प्रसिद्ध आहेत.

 

आपल्या देशात अनेक दिग्गज खेळाडू आहेत यामध्ये सचिन तेंडुलकर, कपिल देव, रोहित शर्मा, विराट कोहली , महेंद्रसिंग धोनी. तसेच क्रिकेट क्षेत्रात भारतीय संघात अनेक यशस्वी कर्णधार होऊन गेलेत त्यामध्ये महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली, रोहित शर्मा, आणि सौरव गांगुली. हे खेळाडू आपल्या भारतीय क्रिकेट संघाचे नेतृत्व अगदी चांगल्या प्रकारे पार पडले आहे. परंतु यावर पाकिस्तानी संघाचे माजी कर्णधार सरफराज खान ने विधान केले आहे.

 

 

नुकत्याच पार पडलेल्या अलीच्या पॉडकास्ट शोमध्ये पाकिस्तान संघाचे माजी कर्णधार सरफराज खान हे सुद्धा सामील झाले होते. त्यामध्ये त्यांना एक प्रश्न विचारला की भारतीय क्रिकेट संघाचा सर्वोत्तम कर्णधार याबद्दल विचारण्यात आले.

 

त्यावेळी पाकिस्तानी संघाचे माजी कर्णधार सरफराज खान यांनी महेंद्रसिंग धोनी चे नाव घेतले. आणि म्हटले की महेंद्रसिंग धोनी सारखा कर्णधार संपूर्ण भारतात सापडणार नाही.

 

सरफराजला विचारण्यात आले होते की, धोनी, कोहली, रोहित आणि सचिन यापैकी भारतीय संघाचा सर्वोत्तम कर्णधार कोण आहे. तर सरफराजने सांगितले – जर भारताच्या सर्वोत्तम कर्णधाराचे नाव घ्यायचे असेल तर मी प्रथम महेंद्रसिंग धोनीचे नाव घेईन. कारण पहिले तो माझ्यासारखाच यष्टिरक्षक फलंदाज आहे आणि दुसरे म्हणजे त्याने संघासाठी अनेक मोठ्या स्पर्धा सुद्धा जिंकल्या आहेत.

 

तसेच सरफराज खान ने असे सुद्धा म्हंटले की मी धोनी ला सर्वात उत्कृष्ट कर्णधार मानतो कारण धोनी च्या नेतृत्वाखाली विराट कोहली, रोहित शर्मा तसेच शमीसारख्या अनेक खेळाडू मैदानात चमकले. तसेच विराट कोहली आणि रोहित शर्मा चे क्रिकेट करियर घडवण्याचे श्रेय फक्त धोनीलाच जाते. धोनी ने 2013 मध्ये रोहित शर्मा ला भारतीय संघाचा ओपनर बनवून रोहित शर्मा च्या क्रिकेट करियर ला टर्निंग पॉइंट दिला.

 

Leave A Reply

Your email address will not be published.