प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्री चा हात असते हे वाक्य तुम्ही बऱ्याच ठिकाणी ऐकल असेल आणि ते खर सुद्धा आहे क्रीडा क्षेत्रात सुद्धा असच आहे प्रत्येक यशस्वी खेळाडूच्या मागे त्याच्या कोच हा हात असतो. कारण गुरूला आपला शिष्य उत्कृष्ठ घडवण्यासाठी अथक प्रयत्न करत असतो. त्याचप्रमाणे भारतीय क्रिकेट संघात अनेक दिग्गज खेळाडू आहेत जे की जगभर प्रसिद्ध आहेत त्यांना घडवण्यासाठी त्यांच्या कोच ने सुद्धा खूप कष्ट केले असणार तर मित्रानो आज आम्ही तुम्हाला या लेखात क्रिकेट क्षेत्रात दिग्गज खेळाडू घडवण्यासाठी कोच ला किती मानधन मिळत या विषयी सविस्तर माहिती सांगणार आहोत.
क्रिकेट कोच ला मिळणार मानधन:-
1) रवी शास्त्री:-
सध्या भारतीय क्रिकेट संघाचे कोच हे रवी शास्त्री हे आहेत. या साठी BCCI रवी शास्त्री यांनी प्रत्येक वर्षी 9 ते 10 करोड रुपये एवढा पगार देते. भारतीय कोच मध्ये रवी शास्त्री यांना सर्वाधिक पगार मिळतो. शास्त्री यांच्या कोचिंगमध्ये भारताने जूनमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची (WTC फायनल) फायनलही सुद्धा खेळली आहे. रवी शास्त्रीच्या प्रशिक्षणाखाली भारताने विश्वचषक 2019 च्या उपांत्य फेरी गाठली, जिथे भारताचा न्यूझीलंडकडून पराभव झाला होता.
हे ही वाचा:- भारतीय क्रिकेट संघाला जगातील नंबर 1 क्रिकेट टीम बनवण्यात या 5 कोच चे मोलाचे योगदान, जाणून घ्या सविस्तर.
2)क्रिस सिल्वरवुड:-
क्रिस सिल्वरवुड हे इंग्लंड क्रिकेट संघाचे सर्वात अनुभवी कोच आहेत. इंग्लंड क्रिकेट बोर्ड क्रिस सिल्वरवुड यांना वर्षाला 5 करोड रुपये एवढे मानधन देते शिवाय ख्रिस सिल्व्हरवुड यांच्या प्रशिक्षकपदाखाली इंग्लंडने न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाला पराभूत करण्यात यश मिळवले आहे.
3)मिकी आर्थर:-
मिकी आर्थर हे श्रीलंका क्रिकेट संघाचे कोच आहेत. वर्षाकाठी श्रीलंका क्रिकेट बोर्ड मिकी आर्थर यांना 4.55 करोड रुपयांचे मानधन देते. मिकी आर्थर यांच्या प्रशिक्षकपदाखाली बांगलादेशने श्रीलंकेविरुद्धची वनडे मालिका २-१ अशी जिंकली आहे. श्रीलंका संघाने गेल्या 4 वर्षात 9 कर्णधार बदलले आहेत पण श्रीलंका क्रिकेट संघाची कामगिरी खराब होत चालली आहे.
4)मिस्बाह उल हक:-
पाकिस्तान क्रिकेट संघाचे कोच मिस्बाह उल हक हे आहेत. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड मिस्बाह उल हक यांना वर्षाला 1.77 करोड रुपये एवढा पगार देते. अनेक खेळाडूंना पाकिस्तान क्रिकेट संघात वाशिल्यावर घेतले आहे असे अनेक आरोप मिस्बाह उल हक यांच्यावर आहेत.
हे ही वाचा:- भारतीय महिला क्रिकेट संघातील या आहेत सर्वोत्कृष्ट गोलंदाज, जाणून घ्या सविस्तर.