महिला आणि पुरुष क्रिकेट संघाबाबत बीसीसीआने घेतला मोठा निर्णय, आता दोघांनाही मिळणार समान पगार..
महिला आणि पुरुष क्रिकेट संघाबाबत बीसीसिआयने घेतला मोठा निर्णय, आता दोघांनाही मिळणार समान पगार..
आपल्या देशात महिलांना नेहमीच दुय्यम स्थान देण्यात येत आले आहे. मग ते कोणत्याही क्षेत्रात का असेना महिलेला नेहमीच दुय्यम वागणूक मिळत आली आहे. या सारखेच क्रिकेट क्षेत्र सुद्धा महिलांना अशीच दुय्यम वागणूक आजपर्यंत देत आले आहेत. मात्र आता बीसीसीआयने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. ज्यामुळे भारतीय महिलां संघ सुद्धा आता पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून समान पगार उचलणार आहे.

आज झालेल्या बैठकीत बीसीसीआयने काही ऐतिहासिक निर्णय घेतले आहेत, ज्यामुळे बिसीसीआयचे सर्वत्र कौतुक होत आहे.आजपर्यंत भारतीय महिला क्रिकेट खेळाडूंना मिळणारा पगार हा पुरुषांच्या पगाराच्या तुलनेत खूपच कमी मिळायचा. आता मात्र या निर्णयाने महिला क्रिकेट खेळाडू सुद्धा पुरुषांच्या बरोबर पगार घेऊ शकणार आहेत.
भारतीय क्रिकेट मंडळात महिला आणि पुरुष क्रिकेट संघातील सदस्यांना त्यांच्या श्रेणी नुसार पगार दिला जातो. पहिल्या श्रेणीत महत्वाचे खेअडू आणि कर्णधार यांचा समवेश असतो तर इतर सर्व खेळाडू हे दुसऱ्या व तृतीय श्रेणीत असतात.
जय शाह यांच्या ट्विटनुसार आता भारतीय महिला क्रिकेटपटूंना पुरुषांइतकेच वेतन मिळणार आहे. कसोटीसाठी 15 लाख, वन डे साठी 6 लाख आणि T20 साठी 3 लाख दिले जातील. समान वेतन ही आमच्या महिला क्रिकेटपटूंप्रती माझी बांधिलकी होती आणि त्यांच्या पाठिंब्याबद्दल मी सर्वोच्च परिषदेचे आभार मानतो. जय हिंद, असेही जय शाह यांनी ट्विट केले.
या निर्णयामुळे भविष्यात नक्कीचं आणखी महिला ह्या क्रिकेटकडे वळतील आणि आपल्या कारकिर्दीला सुरवात करतील अशी अपेक्षा जय शहा यांनी बोलून दाखवलीय.
हेही वाचा:
विराट कोहलीच्या खेळीवर कर्णधार रोहित शर्मा भलताच खुश, सामना जिंकल्यानंतर केले हे मोठे विधान..
Ms धोनी चे फार्महाऊस बघितले तर घालाल तोंडात बोटं, फार्म हाऊस ची किंमत ऐकून विश्वास बसणार नाही.