आपल्या देशामध्ये अनेक खेळ खेळले जातात यामध्ये कब्बडी, कुस्ती, खो खो, हॉकी परंतु आपल्या देशात सर्वात जास्त क्रिकेट चे वेड आहे. लहान मुलापासून ते वयोवृद्ध लोकांपर्यंत लोक आवडीने क्रिकेट पाहतात.
आपल्या देशाचा राष्ट्रीय खेळ हा जरी हॉकी असला तर देशातील सर्वाधिक लोकांची पसंती ही क्रिकेट खेळला आहे. क्रिकेट मध्ये अनेक वेगवेगळी रेकॉर्ड बनली आहेत ज्यामध्ये सर्वात जास्त धावा, सर्वात जास्त कॅच, सर्वात मोठा स्कोअर इत्यादी रेकॉर्ड तुम्ही वाचले किंवा बघितले असतील.
आजपर्यंत क्रिकेट खेळात अनेक विस्फोटक फलंदाजांनी अनेक वेगवेगळी रेकॉर्ड बनवली आहेत. काही रेकॉर्ड तर अशी आहेत जी सहजासहजी ब्रेक सुद्धा होणार नाहीत.
क्रिकेट क्षेत्रात अनेक आक्रमक फलंदाज आहेत. हे फलंदाज मैदानावर खेळताना अत्यंत आक्रमक पणे फलंदाजी करताना आपल्याला दिसतात. असे काही खेळाडू देखील आहेत ज्यांनी केवळ अवघ्या 20 बॉल मध्ये शतक ठोकून दमदार खेळी केली आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये सर्वात जलद शतक झळकवण्याचा रेकॉर्ड हा दक्षिण आफ्रिका संघातील खेळाडू ए बी डिविलियर्स च्या नावी आहे. ए बी डिविलियर्स याला मिस्टर 360 असे सुद्धा म्हंटले जाते.
एबी डिव्हिलियर्सने 2015 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात 31 चेंडूत 100 धावा केल्या होत्या.अत्यंत आक्रमक पने 31 बॉल मध्ये शतक केले होते.
त्यानंतर सर्वात वेगवान शतक ठोकण्याचा विक्रम कोरी अँडरसन या खेळाडूंच्या नावावर होता, ज्यांनी अवघ्या 36 चेंडूत शतक ठोकण्याचा पराक्रम केला आहे.
या सर्वांचा रेकॉर्ड मोडला आहे एका भारतीय खेळाडूने, अवघ्या 20 चेंडू मध्ये शतक ठोकून क्रिकेट इतिहासात आपले नाव कोरले आहे.
भारतीय संघाचे विकेटकीपर फलंदाज म्हणून ओळखले जाणारे रिद्धिमान साहा या खेळाडू ने घरेलु T20 क्रिकेट मध्ये अवघ्या 20 बॉल मध्ये 101 धावा केल्या आहेत. या सामन्यात रिद्धिमान साहा ने 9 चेंडूत सलग 9 षटकार ठोकले आणि यासह 20 चेंडूत शतक ठोकणारा तो जगातील पहिला खेळाडू ठरला. मात्र, तो आंतरराष्ट्रीय सामन्यात हा पराक्रम करू शकला नाही.