भारतीय संघातील ‘या’ खेळाडूने घेतला घेतला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय
भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये ३ सामन्यांची टी -२० मालिका सुरू आहे. ही मालिका सध्या १-१ च्या बरोबरीत आहे. त्यामुळे अंतिम सामना हा निर्णायक सामना ठरणार आहे. दरम्यान अंतिम सामन्यापूर्वी भारतीय संघातील एका खेळाडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला राम राम करण्याचा निर्णय घेतला आहे.
भारतीय संघातील फलंदाज मुरली विजय याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. ही माहिती त्याने सोशल मीडियाद्वारे दिली आहे. त्याच्या म्हणण्यानुसार तो आता कुठल्याही फॉरमॅटमध्ये खेळताना दिसून येणार नाही. मुरली विजयने बीसीसीआय, डॉमेस्टिक क्रिकेट बोर्ड आणि आयपीएलचे देखील आभार मानले आहेत. मुरली विजयने कसोटी, वनडे आणि टी -२० क्रिकेटमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. काही वर्षांपूर्वी तो भारतीय संघातून बाहेर झाला, त्यानंतर त्याला भारतीय संघात पुनरागमन करता आले नाही. तो आयपीएल स्पर्धेत खेळताना दिसून येत होता. मात्र निराशाजनक कामगिरीमुळे त्याला आयपीएल स्पर्धा खेळण्याची देखील संधी मिळाली नाही.
@BCCI @TNCACricket @IPL @ChennaiIPL pic.twitter.com/ri8CCPzzWK
— Murali Vijay (@mvj888) January 30, 2023
अशी राहिली आहे कामगिरी..
मुरली विजयच्या कामगिरी बद्दल बोलायचं झालं तर, त्याने ६१ कसोटी सामन्यांमध्ये ३९८२ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने १२ शतके आणि १५ अर्धशतके झळकावली. तसेच वनडे क्रिकेटबद्दल बोलायचं झालं तर, त्याने १७ सामन्यांमध्ये ३३९ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने केवळ १ अर्धशतक झळकावले होते. तर ९ टी -२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्याने १६९ धावा केल्या आहेत.
हे ही वाचा..