क्रिकेट हा भारताचा राष्ट्रीय खेळ नसला तरी आपल्या देशात सर्वात जास्त वेड क्रिकेट खेळाचे आहे. इतर खेळांपेक्षा लोक क्रिकेट ला जास्त पसंती देतात. तर मित्रांनो आज आम्ही या लेखात अश्या खेळाडू बद्दल सांगणार आहे जे एका फॉरमॅट मध्ये क्रिकेट मधून निवृत्ती घेऊ शकतात तर मित्रांनो जाणून घेऊया कोण आहेत हे खेळाडू.

1) हार्दिक पांड्या:- टेस्ट मॅच
2021 वर्षाच्या शेवटी हार्दिक पांड्याचा फिटनेस हा भारतासाठी चिंतेचा विषय होता. त्याच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते पण त्याने २०२२ मध्ये मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये हार्दिक पांड्या ने शानदार वापसी केली.
हार्दिक पांड्याच्या कसोटी कारकिर्दीबद्दल सांगायचे झाले तर , हार्दिक पांड्याने 11 सामने खेळले आहेत आणि 31.29 च्या सरासरीने 532 धावा केल्या आहेत. गोलंदाजी करताना त्याने 31.06 च्या सरासरीने एकूण 17 विकेट्स घेतल्या आहेत.
2)रविचंद्रन अश्विन- टी20 या वनडे इंटरनेशनल
रविचंद्रन अश्विन हा भारताचा कसोटीतील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू आहे. भारताकडे टी-20 मध्ये इतर पर्याय आहेत पण कसोटीत अश्विनसारखा दुसरा खेळाडू कोणीच नाही त्यामुळे आश्विन ला आंतरराष्ट्रीय टी-20 सोडून कसोटीवर लक्ष केंद्रित करावे लागेल.
अश्विनच्या T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीबद्दल सांगायचे झाल्यास त्याने 65 सामने खेळले आहेत आणि 6.91 च्या इकॉनॉमी रेटच्या मदतीने 72 फलंदाजांना आपले बळी बनवले आहे. तसेच भारतीय संघाचा सर्वात जास्त महत्वाचा खेळाडू म्हणून ओळखले जाते.
3) अजिंक्य रहाणे – टी20 और वनडे इंटरनेशनल
अजिंक्य रहाणेची टी-20 आंतरराष्ट्रीय कारकीर्द बिलकुल चांगली राहिली नाही. वनडे आणि टी-20 च्या तुलनेत कसोटीत त्याची कामगिरी खूपच चांगली आहे.
त्याने T20 आणि ODI पूर्णपणे सोडून देण्याचा विचार केला पाहिजे आणि आपली कसोटी वाचवली पाहिजे. तो सध्या कसोटी संघातून बाहेर आहे.
4)भुवनेश्वर कुमार – टेस्ट क्रिकेट
कारकिर्दीच्या शिखरावर असताना भुवनेश्वरला अनेक मोठ्या दुखापती झाल्या होत्या . त्यामुळे भुवनेश्वर कुमार बराच काळ कसोटी संघाबाहेर असल्यामुळे त्याच्या पुनरागमनाची फारशी आशा नाही. यंदा एकदिवसीय विश्वचषक होणार असून त्यात स्थान मिळवण्याचा प्रयत्नात आहे.
भुवनेश्वर कुमारने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घ्यावी, टी-20 आणि एकदिवसीय क्रिकेटवर लक्ष केंद्रित करावे, कारण कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्यासाठी अत्यंत कमी संधी आहेत.