गब्बर नंतर हे 5 भारतीय क्रिकेटर निवृत्तीच्या उंबरठ्यावर, जाणून घ्या सविस्तर.

0
27
शिखर धवन

 

 

आपल्या देशातील सर्वाधिक लोकप्रिय खेळ ला क्रिकेट आहे. भारताच्या राष्ट्रीय खेळापेक्षा क्रिकेट ला जास्त पसंती मिळते हे तुम्हाला माहीतच असेल. भारतीय क्रिकेट संघ हा जगातील अव्वल दर्जाचा संघ मानला जातो कारण भारतीय क्रिकेट संघात अनेक दिग्गज खेळाडू आहेत ज्यांचे फॅन्स जगभर पसरलेले आहेत. तर मित्रानो आज आम्ही तुम्हाला या लेखात शिखर धवन नंतर कोणते भारतीय खेळाडू क्रिकेटमधून संघास घेण्याच्या मार्गावर आहेत ज्यांना बरेच दिवस संघापसून बाहेर ठेवण्यात आले, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.

शिखर धवन

निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेले भारतीय क्रिकेटर:-

 

पीयूष चावला:-

 

भारतीय क्रिकेट संघाचा आक्रमक गोलंदाज म्हणून पीयूष चावला ला ओळखले जाते. पीयूष चावला भारतीय संघात swing गोलंदाज होता. पीयूष चावला ने 2011 मध्ये महेंद्रसिंग धोनी सोबत वन डे वर्ल्ड कप खेळाला होता. त्यानंतर त्याने 2012 साली शेवटचा सामना खेळला. पीयूष चावला आतापर्यंत 3 कसोटी,25 वन डे सामने 7 T 20 सामने खेळून 39 बळी मिळवले आहेत.

 

 

उमेश यादव:-

 

उमेश यादव याला विदर्भ एक्सप्रेस या नावाने ओळखले जाते. उमेश यादव ने जून 2023 रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपला शेवटचा सामना खेळला होता. 36 वर्षीय उमेशने 57 कसोटी, 75 वन डे आणि 9 टी20 सामने खेळले आहेत. कसोटीत त्याच्या नावावर 170, तर वन डे मध्ये 106 विकेटची नोंद आहे. टी 20 मध्येही त्याने 12 विकेट्स घेतल्या आहेत.

 

हे ही वाचा:- भारतीय क्रिकेट संघाला जगातील नंबर 1 क्रिकेट टीम बनवण्यात या 5 कोच चे मोलाचे योगदान, जाणून घ्या सविस्तर.

 

 

 

ऋद्धिमान साहा :-

 

महेंद्रसिंग धोनी ने क्रिकेट मधून सन्यास घेतल्यानंतर सर्वात जास्त संधी या साहा ला मिळाल्या होत्या. परंतु त्याला संधीचे सोने करता आले नाही. 2021 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध तो आपला शेवटचा सामना खेळला. आतापर्यंत ऋद्धिमान साहा ने 40 कसोटी आणि 9 वन डे सामने खेळले आहेत. आणि आता त्याचे वय 40 वर्ष झाले असल्याने भारतीय क्रिकेट संघातून त्याला बाहेर जावे लागेल.

 

images 49

ऋषी धवन :-

हिमाचल प्रदेशचा अष्टपैलू खेळाडू ऋषी धवन टीम इंडियाकडून 3 वन डे आणि 1 टी20 सामना खेळला आहे. मात्र त्याला क्रिकेट मध्ये विषेश कामगिरी करता आली नाही. त्यामुळे त्याला संघापासून बरेच दिवस बाहेर ठेवण्यात आले. ऋषी धवन ने आपला शेवटचा सामना 2016 मध्ये खेळाला होता तेव्हापासून तो संघाच्या बाहेर आहे.

 

 

मोहित शर्मा :-

मोहित शर्मा भारतीय क्रिकेट संघातून 26 वन डे आणि 8 टी20 सामने खेळला आहे. या मध्ये मोहित शर्मा ने 37 विकेट्स घेतल्या. 35 वर्षीय मोहितने 2015 मध्ये अखेरचा सामना खेळला होता. तेव्हापासून मोहित शर्मा भारतीय क्रिकेट संघापासून लांब आहे.

 

हे ही वाचा:- भारताच्या या 4 क्रिकेटर नी केले आहे आपले हेअर ट्रान्सप्लांट, भारताच्या या दिग्गज खेळाडूंचा समावेश.

 

 

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here