Indian Cricketers who divorced: शिखर धवनच्या आधी ‘या’ 4 स्टार क्रीकेटपटूचा देखील झाला आहे घटस्फोट, एकजनाने तर केलेत 3 लग्न..

Indian Cricketers who divorced: शिखर धवनच्या आधी 'या' 4 स्टार क्रीकेटपटूचा देखील झाला आहे घटस्फोट, एकजनाने तर केलेत 3 लग्न..

 Indian Cricketers who divorced: काही दिवसांपूर्वी टीम इंडियाचा ओपनिंग बॅट्समन शिखर धवन आणि त्याची पत्नी आयशा मुखर्जी यांच्यात घटस्फोट झाला आहे. 30 ऑक्टोबर 2012 रोजी धवन आणि आयशा मुखर्जीचे लग्न झाले. शिखर धवन आणि आयेशा मुखर्जी यांना एक मुलगा देखील आहे. ऑस्ट्रेलियात जन्मलेल्या आयशाने शिखर धवनसोबत दुसरे लग्न केले होते. धवनच्या आधी तिचे लग्न एका ऑस्ट्रेलियन बिझनेसमनशी झाले होते.

आयशाला तिच्या पहिल्या पतीपासून दोन मुली आहेत, ज्यांची नावे रिया आणि आलिया आहेत.

सुरेश रैना ते केएल राहुल..! शिखर धवनच्या वाढदिवसानिमित्त स्टार खेळाडूंनी केला शुभेच्छांचा वर्षाव, सोशल मिडीयावर ट्वीटस तुफान व्हायरल..

धवन व्यतिरिक्त इतर अनेक भारतीय क्रिकेटपटू आहेत ज्यांनी लग्न केले पण त्यांचे लग्न फार काळ टिकले नाही. चला तर आजच्या या विशेष फिचर मध्ये तुम्हाला अशा खेळाडूंबद्दल माहिती देतो ज्यांनी आपल्या पत्नीला घटस्फोट दिला आहे. या यादीमध्ये टीम इंडियाचे प्रसिद्ध खेळाडूंची नवे सामील आहेत.

या भारतीय खेळाडूंनी  लग्नानंतर काही दिवसातच आपला पत्नींना घटस्फोट दिलाय. ( Indian Cricketers who divorced wife)

1.दिनेश कार्तिक (Dinesh Kartik)

टीम इंडियाचा माजी  विकेटकीपर-फलंदाज दिनेश कार्तिकचा पहिला विवाह निकिता वंजारासोबत झाला होता. दिनेश नंतर कार्तिक ची पत्नी टीम इंडियाचा सलामीवीर मुरली विजयच्या (Murali Vijay & Nikita vanjara  Aafair) प्रेमात पडली. लग्न झालेले असून सुद्धा या दोघांचे अफेअर सुरु होते. ही गोष्ट कार्तिकला कळताच त्याने निकिताला घटस्फोट दिला. घटस्फोटानंतर मुरली विजय आणि निकिताने लग्न केले .

 

View this post on Instagram

 

A post shared by Nikita Vijay (@niki.vijay)

त्यानंतर दिनेशने 2015 मध्ये भारतीय स्क्वॅशपटू दीपिका पल्लीकलशी लग्न केले. आज दिनेशही क्रिकेट कॉमेंट्री करताना दिसतो. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील त्याची कॉमेंट्री खूप पसंत केली जात होती.

2.मोहम्मद अझरुद्दीन (Mohammad Azharuddin)

टीम इंडियाचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीननेही (mohammad azharuddin) दोनदा लग्न केले आहे. त्यांचे पहिले लग्न नौरीन यांच्याशी झाले होते ज्यातून त्यांना दोन मुले होती. पण सततच्या वादामुळे त्यांनी 1996 मध्येपहिल्या पत्नीला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला.

त्यानंतर पुन्हा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन अभिनेत्री संगीता बिलजानीच्या प्रेमात पडला आणि दोघांनी लग्न केले.अभिनेत्री संगीता बिलजानीपासून वेगळे झाले. संगीतासोबतचे त्यांचे लग्नही २०१० मध्ये संपले.

3.विनोद कांबळी ( Vinod Kambli)

टीम इंडियाचा माजी फलंदाज विनोद कांबळीने ( Vinod Kambli)1998 मध्ये त्याची बालपणीची मैत्रिण नोएला लुईसशी लग्न केले. मात्र नंतर त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर माजी मॉडेल एंड्रिया हेविटशी लग्न करण्यासाठी त्याने तिला घटस्फोट दिल्याचे उघड झाले.

4.जवागल श्रीनाथ (Javagal Srinath)

Indian Cricketers who divorced his wife
Indian Cricketers who divorced his wife

टीम इंडियाचा माजी वेगवान गोलंदाज जवागल श्रीनाथचे पहिले लग्न ज्योत्स्नासोबत झाले होते. पण नंतर ते माधवी पत्रावली नावाच्या पत्रकाराच्या प्रेमात पडला. जवागल ज्योत्सनाशी लग्न करण्यासाठी घटस्फोट दिला. नंतर दोघांनी  2008 मध्ये  पुन्हा लग्न केले. ( Indian Cricketers who divorced his wife)


हेही वाचा:

IND vs SA: “जर आम्हाला सामना जिंकायचा असेल तर..” , पहिल्या कसोटीमध्ये मानहानीकारक पराभवानंतर कर्णधार रोहित शर्माने केले मोठे वक्तव्य..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *