भारतीय वंशाच्या हे 5 खेळाडू आहेत या देशाच्या क्रिकेट संघाचे कर्णधार, जाणून घ्या कोण आहेत ते खेळाडू.
जगभरात क्रिकेट चे हजारो लाखो चाहते आहेत. तसेच आपल्या देशात सुद्धा अनेक लोकांना क्रिकेट चे वेड आहे. अगदी लहान मुलापासून ते वयोवृद्ध लोकांपर्यंत प्रत्येकाला क्रिकेट चे वेड आहे. क्रिकेट मध्ये खेळण्यासाठी 11 खेळाडू असतात. परंतु काही वेळेस संधी न मिळाल्यामुळे अनेक खेळाडू बाहेरच्या देशात जाऊन तेथील क्रिकेट संघात क्रिकेट खेळतात. आपल्या देशात असे अनेक खेळाडू आहेत जे दुसऱ्या देशाच्या क्रिकेट संघाचे कर्णधार सुद्धा आहेत.
तर मित्रांनो आज आम्ही या लेखात तुम्हाला अश्या खेळाडू बद्दल सांगणार आहे जे भारतीय संघासाठी न खेळता बाहेरील देशातील क्रिकेट संघातून खेळत आहेत एवढंच न्हवे तर ते तेथील संघाचे कर्णधार सुद्धा बनले आहेत.

नासिर हुसैन :-
इंग्लंड क्रिकेट संघाचे माजी कर्णधार नासिर हुसैन हे एक मूळ भारतीय होते. हे खूपच कमी लोकांना माहीत असेल. जो भारतासाठी क्रिकेट खेळला. नासिर हुसेन यांचा जन्म चेन्नई येथे झाला. त्याने दीर्घकाळ इंग्लंड संघाचे नेतृत्वही केले.
केशव महाराज :-
या यादीत दुय्यम स्थानावर केशव महाराज या खेळाडूचा समावेश आहे. केशव महाराज हे दक्षिण आफ्रिका संघाचे एक उत्कृष्ठ गोलंदाज होते. आणि विशेष म्हणजे ते भारतीय वंशाचे होते. भारतीय असून सुद्धा केशव महाराज यांनी अनेक वेळा भारतीय क्रिकेट संघाच्या विरुद्ध खेळले.
शिवनारायण चंद्रपाल:-
शिवनारायण चंद्रपॉल हा वेस्ट इंडिजचा माजी दिग्गज खेळाडू होता, जो इंडो-गुआनीज कुटुंबातील होता. शिवनारायण चंद्रपॉल हे भारतीय वंशाचे होते. पण तो वेस्ट इंडिज देशासाठी क्रिकेट खेळला आणि संघाचे नेतृत्व सुद्धा केले.
रोहन कन्हाई:-
वेस्ट इंडिजकडून खेळलेला माजी क्रिकेटपटू रोहन कन्हाई हादेखील भारतीय वंशाचा होता. त्यांनी 1972-73 आणि 1973-74 दरम्यान 13 कसोटी सामन्यांमध्ये वेस्ट इंडिज संघाचे नेतृत्व केले.
हाशिम आमला:-
हाशिम आमला हा दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार असलेला भारतीय वंशाचा पहिला खेळाडू होता. हाशिम आमला यांचे पूर्वज भारतातून गेले होते आणि आफ्रिकेत राहू लागले होते. 2015 मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या भारत दौऱ्यावर संघाचे नेतृत्व हाशिम आमला याने केले.