पैसे नसल्यामुळे आणि उपचार न मिळाल्यामुळे या भारतीय क्रिकेटर चा झाला होता मृत्यू, कॅबरे डान्समधून पैसे उभे करून कुटुंबाला केली मदत.
आपल्या देशात बॉलिवूड आणि क्रिकेटर यांच्याकडे अमाप पैसा आणि प्रसिद्धी असते हे आपल्याला माहीतच आहे. तसेच या लोकांचे जीवन सर्व सामान्य लोकांपेक्षा अत्यंत वेगळे असते शिवाय जीवनशैली सुद्धा निराळी असते.
बॉलिवूड आणि क्रिकेटर म्हतल की सर्वधी आपल्या समोर येते ते म्हणजे पैसा आणि प्रसिद्धी तसेच महागड्या गाड्या, वस्तू, करोडो रुपयांची घरे आणि महागडी जीवनशैली हे माहीतच आहे.
परंतु मित्रांनो तुम्हाला अस सांगितलं की एका भारतीय क्रिकेटर चा मृत्यू पैसे नसल्यामुळे आणि उपचार न मिळाल्यामुळे झाला आहे हे ऐकल्यावर तुम्हाला यावर विश्वास बसणार नाही. परंतु हे सत्य आहे तर मित्रांनो या लेखात जाणून घेऊया कोण आहे तो खेळाडू.

आपण ज्या क्रिकेटपटूबद्दल बोलत आहोत ते म्हणजे दत्ताराम हिंदलेकर हे आहेत दत्ताराम हिंदलेकरयांचा जन्म 1 जानेवारी 1909 रोजी मुंबईत झाला. दत्ताराम हिंदलेकर यांनी भारतासाठी फक्त इंग्लंडच्या भूमीवर चार कसोटी सामने खेळले. मात्र उपचाराअभावी आणि पैसे नसल्याने वयाच्या अवघ्या ४० व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला. ते विजय मांजरेकर यांचे काका आणि संजय मांजरेकर यांचे आजोबा होते.
दत्ताराम हिंदलेकर हे शेतकरी आणि अत्यंत गरीब कुटुंबातील होते. त्याचे वडील बॉम्बे पोर्ट ट्रस्ट येथे 80 रुपये महिना पगारावर काम करायचे. पैशाअभावी तो स्वत:साठी हातमोजेही विकत घेऊ शकला नाही. तो यष्टिरक्षक खरशेद महाहोमजीच्या हातमोजेने विकेटकीपिंग करत असे. त्याला त्याच्या आजाराची खूप उशिरा कल्पना आली आणि त्याला योग्य उपचार न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाला.
नंतर त्याच्या कुटुंबाला मदत करण्यासाठी बीसीसीआय आणि बॉम्बे क्रिकेट असोसिएशनने लोकांना मदतीचे आवाहन केले. परंतु यातून काही विशेष मदत मिळाली नाही. त्यानंतर बॉम्बे पोर्ट ट्रस्टने ६ ऑगस्ट १९४९ रोजी कॅबरे नृत्याचे आयोजन केले होते. त्यामुळे ₹7000 जमा झाले, जे हिंदलेकर यांच्या कुटुंबीयांना देण्यात आले. परंतु योग्य वेळी उपचार न झाल्यामुळे वयाच्या 40 व्या वर्षी मृत्यू झाला.