सध्या संपूर्ण जगात क्रिकेट चे वेड वाढले आहे परंतु देशात अजून असे सुद्धा लोक आहेत जे स्वतःचा देशात राहून दुसऱ्या संघाला सपोर्ट करतात. हे तुम्हाला माहीतच असेल. सध्या क्रिकेट चे वेड दिवसेंदिवस वाढतच चालले आहे.

तर मित्रांनो या लेखात आम्ही अश्या खेळाडू बद्दल सांगणार आहे की ज्यांचा जन्म भारतात झाला असून सुद्धा T20 वर्ल्ड कप हा युनायटेड अरब अमिरात या देशाकडून खेळणार आहेत. तर चला तर जाणून घेऊ कोण आहेत हे खेळाडू.
अलीशान शराफु:-
अलीशान शराफु याचा जन्म केरळ राज्यात झाला असून 19 वर्षातच अलीशान शराफु ने आपले नाव UAE च्या संघात घातले आहे. त्यामुळे येणाऱ्या T20 सामन्यात अलीशान शराफु हा USE देशासाठी खेळणार आहे. अलीशान शराफु ने T20 इंटरनॅशल चे 6 मॅचेस खेळल्या आणि फक्त 34 धावा काढल्या आहेत.
कार्तिक मयप्पन:-
कार्तिक मयप्पन हा 21 वर्षीय खेळाडू आहे शिवाय या आधी IPL मध्ये सुद्धा हा खेळला आहे. हा एक लेग स्पिनर गोलंदाज आहे. कार्तिक मयप्पन चा जन्म हा चेन्नई मध्ये झाला असून पुढील सामने UAE देशासाठी खेळताना आपल्याला दिसणार आहे. तसेच T20 इंटरनॅशनल सामन्यात 11 सामने खेळून 17 गडी बाद केले आहेत.
सीपी रिजवान:-
सीपी रिजवान हा खेळाडूचा जन्म केरळ मध्ये झाला असून UAE संघाचा कर्णधार म्हणून याची निवड झाली आहे. सीपी रिजवान हा आक्रमण फलंदाज आहे. करियर बद्दल बोलायचे म्हंटले तर T20 इंटरनॅशनल 12 सामन्यात 218 धावा काढल्या आहेत.
चिराग सूरी:-
चिराग सूरी हा खेळाडू IPL मध्ये गुजरात लायन्स संघाकडून खेळायचा. चिराग सूरी या खेळाडू चा जन्म हा दिल्ली मध्ये झाला आहे. करियर बद्दल सांगायचे म्हटले तर आतापर्यंत चिराग ने T 20 आंतररा्ट्रीय 29 सामने खेळून 793 धावा बनवल्या आहेत.
वृत्य अरविंद:-
वृत्य अरविंद या खेळाडू चा जन्म चेन्नई मध्ये झाला असून आता आपल्याला UAE संघाचे उपकर्णधार म्हणून दिसणार आहेत.करियर बद्दल सांगायचे म्हटले तर आतापर्यंत चिराग ने T 20 आंतररा्ट्रीय 22 सामने खेळून 488 धावा बनवल्या आहेत.
आर्यन लाकरा:-
या खेळाडू चा जन्म हा पंजाब मध्ये झाला असून हा एक उत्कृष्ठ गोलंदाज आहे. आर्यन लाकरा चे वय सध्या 20 आहेत. करियर बद्दल सांगायचे म्हटले तर आतापर्यंत आर्यन लाकरा ने 11 विकेट घेऊन चांगल्या चांगल्या फलंदाजांना पवेलियन चा रस्ता दाखवला आहे.