- Advertisement -

तिसऱ्या वनडेपूर्वी भारतीय खेळाडूंची महाकालच्या दरबारी हजेरी! रिषभ पंतसाठी केली प्रार्थना…

0 1

भारत विरुद्ध न्यूझीलंड (Ind vs NZ) यांच्यात ३ वनडे सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील अंतिम सामना मंगळवारी पार पडणार आहे. हे दोन्ही संघ इंदोरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर आमने सामने येणार आहेत. या सामन्यापूर्वी भारतीय संघातील काही खेळाडूंनी उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरात हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले आहे. तसेच रिषभ पंतसाठी प्रार्थना देखील केली आहे.

सध्या भारतीय खेळाडूंचे मंदिरात दर्शन घेत असल्याचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. या फोटोजमध्ये भारतीय संघातील सूर्यकुमार यादव, वॉशिंग्टन सुदंर आणि कुलदीप यादव महकालेश्वर मंदिरात महाकालचे दर्शन घेताना दिसून येत आहे. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, तिन्ही खेळाडूंनी पिवळ्या रंगाचे कपडे घातले असून, हे खेळाडू शिवलिंगासमोर हात जोडताना दिसून येत आहेत.

 

वनडे मालिकेत भारतीय संघाची आघाडी..

भारतीय संघाने या वनडे मालिकेत जोरदार कामगिरी केली आहे. मालिकेतील पहिल्या दोन्ही सामन्यात विजय मिळवत भारतीय संघाने २-० ची विजयी आघाडी घेतली आहे. आता रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणारा संघ न्यूझीलंड संघाचा क्लीनस्वीप करण्याच्या प्रयत्नात असणार आहे. जर तिसऱ्या सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला तर भारतीय संघ ही मालिका ३-० ने आपल्या नावावर करेल. तसेच वनडे रँकिंगमध्ये याचा भारतीय संघाला मोठा फायदा होणार आहे.

असे आहेत दोन्ही संघ..

भारतीय संघ – रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, ईशान किशन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, केएस भरत (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक.

न्यूझीलंड संघ- टॉम लॅथम (कर्णधार), फिन ऍलन, मायकेल ब्रेसवेल, मार्क चॅपमन, डेव्हॉन कॉनवे, जेकब डफी, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, ॲडम मिल्ने, डॅरिल मिशेल, हेन्री निकोल्स, ग्लेन फिलिप्स, मिशेल सँटनर, हेन्री शिपले, ईश सोढी, ब्लेअर टिकनर.

हे ही  वाचा..

एक चौकार रोखण्यासाठी धावले ४ क्षेत्ररक्षक..चौकार तर थांबवला, पहा व्हायरल व्हिडिओ 

“हा भारतीय गोलंदाज जगभरातील क्रिकेटवर राज्य करेल”मोहम्मद शमीने या तरुण गोलंदाजाविषयी केले मोठे वक्तव्य.!

Leave A Reply

Your email address will not be published.