आयसीसी 2023 मध्ये भारताचा पुढचा सामना इंग्लंडविरुद्ध रविवारी लखनऊच्या मैदानावर होणार आहे. या सामन्यासाठी भारतीय क्रिकेट संघ लखनऊ मध्ये काल दाखल झाला. भारतीय संघाचे जोरदार स्वागत करण्यात आले. पण भारतीय संघाच्या या बस मध्ये हार्दिक पांड्या कुठेच दिसला नाही. लखनऊ मध्ये आगमन होतास भारतीय संघाचा एक छोटासा व्हिडिओ बीसीसीआयने त्यांच्या ट्विटर हँडल वर शेअर केला आहे.
भारतीय संघ लखनऊमध्ये दाखल होताच तो थेट विमानतळावरून हॉटेलमध्ये पोहोचला. शुक्रवारच्या दिवशी भारतीय संघाने हॉटेलवरच थांबून आराम केला. न्यूझीलंड विरुद्ध रविवारी झालेल्या सामन्यानंतर भारतीय संघ फिरण्यासाठी ट्रेकिंगला गेला होता. रिलॅक्स होण्यासाठी भारतीय संघाने ट्रेक ची मोहीम आखली होती. सलग दोन दिवस ते हिमाचल प्रदेश मध्ये निसर्गाचा आनंद लुटत होते.
आयसीसी 2023 विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने सलग पाच सामने जिंकले आहेत. रविवारी इंग्लंड विरुद्ध चा सामना भारतीय संघाने जिंकला तर त्याचे सेमी फायनल चे तिकीट पक्के होऊन जाईल. हा विजय मिळाला तर भारतीय संघ सलग सहा सामने जिंकण्याचा पराक्रम करेल.
दुखापतीमुळे अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या मागील दोन सामन्यास मुकला. त्याची दुखापत ही गंभीर नसली तरी महत्त्वाच्या सामन्यासाठी पंड्या उपलब्ध राहावा यासाठी त्याची दुखापत ही पूर्ण बरी होण्यासाठी त्याला दीर्घकाळ विश्राम दिला जात आहे. इंग्लंड आणि श्रीलंके विरुद्ध होणाऱ्या सामन्यांमध्ये तो कदाचित उपलब्ध नसेल. मात्र तो दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँड संघाविरुद्ध होणाऱ्या सामन्यासाठी उपलब्ध होऊ शकतो.
बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात हार्दिकचा पाय मुडपला होता. त्यामुळे त्याच्या पायावर सूज आली आहे. सुदैवाने त्याच्या पायाला कुठलेच फ्रॅक्चर झाले नाही. हार्दिक पंड्या अनफिट असल्यामुळे भारतीय संघात न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात दोन बदल करण्यात आले. वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरच्या ऐवजी मोहम्मद शमी तर हार्दिक पांड्याच्या जागी सूर्यकुमार यादव यांना संधी देण्यात आली. सूर्याला या सामन्यात आपली चमक दाखवता आली नाही. तो अवघ्या दोन धावातच माघारी परतला तर मोहम्मद शमी याने पहिल्याच सामन्यात 5 बळी घेत विश्वचषक स्पर्धेत दमदार सुरुवात करून दाखवली.
इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या सामन्यासाठी भारतीय संघात कोणताच बदल होण्याची शक्यता कमी आहे. कारण शार्दुल ठाकूरचा फ्लॉप शो या स्पर्धेत सुरू आहे. त्याला विश्वचषकातील तीन सामन्यात केवळ दोनच बळी मिळवता आले.