भारतीय संघाने सामना तर जिंकला, मात्र झाली ‘या’ लाजिरवाण्या विक्रमाची नोंद..
भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये ३ टी -२० सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसरा टी -२० सामना २९ जानेवारी रोजी पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने जोरदार विजय मिळवत मालिका १-१ ने बरोबरीत आणली आहे. हा सामना भारतीय संघाने जिंकला मात्र भारतीय संघाच्या नावे एका नको असलेल्या विक्रमाची नोंद झाली आहे.
टी -२० क्रिकेट म्हणजे चौकार आणि षटकारांचा खेळ. मात्र न्यूझीलंड विरुध्द झालेल्या दुसऱ्या टी -२० सामन्यात भारतीय संघातील एकही खेळाडूला षटकार मारता आला नाहीये. न्यूझीलंड संघाने प्रथम फलंदाजी करताना ८ गडी बाद ९९ धावा केल्या होत्या. हा सामना जिंकण्यासाठी भारतीय संघाला २० षटक अखेर १०० धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाने १९.५ षटक अखेर ४ गडी बाद १०१ धावा करत सामना जिंकला.

मुख्य बाब म्हणजे या १०० धावा एकही षटकार न मारता केल्या गेल्या. टी -२० क्रिकेटच्या इतिहासात भारतीय संघाने पहिल्यांदाच एकही षटकार मारला नाहीये. भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना अर्शदीप सिंगला २ गडी बाद करण्यात यश आले. यासह हार्दिक पंड्या, वॉशिंग्टन सुदंर, युझवेंद्र चहल, दीपक हुड्डा आणि कुलदीप यादव यांना १-१ गडी बाद करण्यात यश आले. न्यूझीलंड संघासाठी कर्णधार मिचेल सॅंटनरने सर्वाधिक १९ धावांची खेळी केली.
हे ही वाचा..