Ind vs Aus: अंतिम २ कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा! या खेळाडूंना मिळाली संधी

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ४ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात भारतीय संघाने जोरदार कामगिरी करत विजय मिळवला आहे. यासह मालिकेत २-० ची आघाडी घेतली आहे.
या मालिकेनंतर आता उर्वरित दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. असा अंदाज व्यक्त केला जात होता की, देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या सरफराज खानला संधी दिली जाईल. मात्र त्याला देखील या संघात स्थान देण्यात आलं नाहीये. उर्वरित २ कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघात कुठलाही बदल करण्यात आलेला नाहीये.

शेवटच्या २ कसोटी सामन्यासाठी असा आहे भारतीय संघ..
रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, केएल राहुल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, केएस भरत (विकेतकिपर), ईशान किशन (विकेटकिपर), आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, उमेश यादव, जयदेव उनाडकट.
हे ही वाचा..