VIRAL VIDEO: विश्वचषक ट्रॉफी हातात येताच कर्णधार शेफाली वर्मा झाली भावूक, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..
भारताच्या मुलींनी इतिहास रचला आहे. महिला अंडर-19 विश्वचषक स्पर्धेत भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने शानदार कामगिरी करत सामना जिंकून इतिहास रचला. सामन्यानंतर कर्णधार शेफाली वर्मा भावूक झाली. ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर तुफान व्हायरल होतोय.
विश्वचषक ट्रॉफी जिंकल्यानंतर शेफाली वर्मा भावूक झाली .
Incredible pictures from a memorable title win 📸#U19T20WorldCup pic.twitter.com/GdkIeWXAe3
— ICC (@ICC) January 29, 2023
सामना जिंकल्यानंतर टीम इंडियाच्या आनंदाला पारावार उरला नाही. पण सामन्यानंतर जेव्हा कर्णधार शेफाली वर्मा बोलली तेव्हा ती काही काळ भावूक झाली, ज्याचा एक फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती इमोशनल दिसत आहे. पण त्याने आपल्या संघासाठी आनंदही व्यक्त केला.
भारताने इंग्लंडचा पराभव केला.
या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता, भारतीय गोलंदाजांनी या सामन्यात धुमाकूळ घातला. भारतीय गोलंदाजांनी अप्रतिम गोलंदाजी करत इंग्लंडचा संघ १७.१ षटकांत ६८ धावांत गुंडाळला. भारताकडून पार्श्वी चोप्रा आणि तीतस साधूने 2-2 विकेट घेतल्या. त्यानंतर उर्वरित काम भारतीय फलंदाजांनी केले.

भारतीय फलंदाजांनी शानदार फलंदाजी केली.
सामन्यात धावसंख्येचा पाठलाग करताना भारतीय संघाने शानदार फलंदाजी केली, भारताकडून सोम्या तिवारी आणि गोंगडी त्रिशा यांनी 24-24 धावा केल्या, तर कर्णधार शेफाली वर्मानेही 15 धावा केल्या. भारतीय संघाने 14 षटकात 3 गडी गमावून 69 धावा करत विजय मिळवला.
I m not crying you are ❤🥺 World Champions Team India. #U19T20WorldCup pic.twitter.com/AKDC3Gsk0D
— Bleed Blue (@CricCrazyVeena) January 29, 2023
विश्वचषक जिंकलेल्या संघावर संपूर्ण देशभरातून कौतुकाचा वर्षाव केला जातोय. महिला क्रिकेट संघाची खेळाडू हरमनप्रीत,हरलीन देओल. मिताली राज यांच्यासह अनेक दिग्गज खेळाडूंनी ट्वीट करत U19 संघाचे अभिनंदन केले आहे.
हे ही वाचा..
दुसऱ्या टी -२० साठी अशी असू शकते भारतीय संघाची प्लेइंग ईलेव्हेन,’या’ २ खेळाडूंना मिळणार डच्चू