क्रिकेट हा भारतीय देशाचा राष्ट्रीय खेळ नसला तरी भारतीय क्रिकेट संघ क्रिकेट खेळात संपूर्ण जगभरात अग्रेसर आहे. परदेशी असलेल्या क्रिकेट खेळात भारतीय क्रिकेट संघाने आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे यात कसलीच शंका नाही. भारतीय क्रिकेट संघात अशे अनेक खेळाडू आहेत ज्यांचे फॅन्स परदेशात सुद्धा आहेत.
भारतीय पुरुष क्रिकेट संघाबरोबर भारतीय महिला क्रिकेट संघ सुद्धा अत्यंत तडफदार संघ आहे. सध्या चालू असलेल्या भारत विरुद्ध ऑस्टरेलिया अनऑफिशियल टेस्ट सामना चांगलाच रंगतदार होत आहे. भारतीय महिला क्रिकेट अ संघ विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट अ संघ या दोन संघामध्ये 4 दिवसीय अनऑफिशियल टेस्ट सामना सुरू आहे. कांगारू ने भारतीय क्रिकेट संघाला 289 धावांचे लक्ष्य दिले आहे.
भारतीय महिला क्रिकेट संघाने तिसऱ्या दिवसापर्यंत 6 विकेट्स गमावून 68 ओव्हरमध्ये 149 धावा केल्या आहेत. त्यामुळे टीम इंडियाला शेवटच्या दिवशी विजय मिळवण्यासाठी 140 धावांची गरज आहे. तर ऑस्ट्रेलिया विजयापासून फक्त 4 विकेट्स दूर आहे.
हे ही वाचा:- भारतीय क्रिकेटर वापरतात एवढ्या महागड्या बॅट, किंमत ऐकून विश्वास बसणार नाही.
सामना कसा झाला:-
आतापर्यंत भारतीय महिला क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलिया संघाला 212 धावांवर बाद केले. कांगारू विरुद्ध भारतीय महिला संघाने अवघ्या 184 धावा काढल्या होत्या त्यामध्ये कांगारू संघाला 28 धावांचे लीड मिळाले. ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत दुसर्या डावात 60 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 164 धावा केल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलिया संघाला 192 धावांची आघाडी मिळाली. ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या दिवशी 3 विकेट्सच्या मोबदल्यात 96 धावा केल्या. ऑस्ट्रेलिया अशाप्रकारे दुसऱ्या डावात 260 धावांवर ऑलआऊट झाली. त्यासह टीम इंडियाला 289 धावांचं आव्हान मिळालं. त्यामुळं भारतीय महिला क्रिकेट संघाला जिंकण्यासाठी 140 धावांची गरज आहे. त्यामुळे हा सामना जास्तच रंगतदार झाला आहे.
भारतीय महिला क्रिकेट संघाची Second इनिंग:-
भारतीय महिला क्रिकेट संघाला 289 धावांचे लक्ष्य गाठायचे होते त्यामुळे सुरुवात चांगली करणे गरजेचे होते. परंतु भारतीय क्रिकेट संघाला अपयश आले. दुसऱ्या आणि तिसऱ्या इनिंग मध्ये सुद्धा भारताच्या हाती अपयश च आले. त्यासाठी भारतीय महिला क्रिकेट संघाला जिंकण्यासाठी 140 धावांची गरज आहे.
वूमन्स ऑस्ट्रेलिया ए प्लेइंग ईलेव्हन :-
चार्ली नॉट (कर्णधार), एम्मा डी ब्रो, जॉर्जिया वॉल, निकोल फाल्टम, टेस फ्लिंटॉफ, मॅडी डार्क (विकेटकीपर), मॅटलान ब्राउन, केट पीटरसन, लिली मिल्स, ग्रेस पार्सन्स आणि निकोला हॅनकॉक.
वूमन्स इंडिया ए प्लेइंग ईलेव्हन :-
मिन्नू मणी (कर्णधार), श्वेता सेहरावत, प्रिया पुनिया, शुभा सतीश, तेजल हसबनीस, बिस्त राघवी, सजीवन सजाना, उमा चेत्री (विकेटकीपर), मन्नत कश्यप, प्रिया मिश्रा आणि सायली सातघरे.
हे ही वाचा:- विनेश फोगट आहे इतक्या कोटींची मालक, तिची संपत्ती जाणून घेतल्यावर तुमचा विश्वास बसणार नाही: