आपल्या देशात सर्वात जास्त संपत्ती ही बॉलिवूड, उद्योगपती आणि क्रिकेटर यांच्याकडे आहे हे सर्वांना माहीत आहे. परंतु सर्वात श्रीमंत क्रिकेटर कोण असा प्रश्न आला की सर्वात समोर पाहिले नाव येते ते म्हणजे विराट कोहली. महेंद्रसिंग धोनी परंतु मित्रानो आज आम्ही तुम्हाला या लेखात अश्या क्रिकेटर बद्दल सांगणार आहे जो क्रिकेट क्षेत्रात सर्वात श्रीमंत क्रिकेटर आहे त्याने धोनी आणि कोहली ला सुद्धा मागे टाकले आहे.
भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंना BCCI करोडो रुपयांचे मानधन देते त्याचसोबत बाहेरील कमाई म्हणजे जाहिराती, बिजनेस या माध्यमातून क्रिकेटर करोडो रुपयांची कमाई करतात. त्यामुळे परदेशी क्रिकेटर पेक्षा भारतीय क्रिकेटर मोठ्या प्रमाणावर कमाई करतात.
कुमार मंगलम बिर्ला यांचा मुलगा आर्यमन बिर्ला हा विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी पेक्षा किती तरी पटीने श्रीमंत आहे. आर्यमन बिर्ला हा भारतीय क्रिकेट संघातील सर्वात श्रीमंत खेळाडू आहे. त्याचबरोबर जगातील सर्वात श्रीमंत खेळाडू सुद्धा आर्यमन बिर्ला हा आहे.
हे ही वाचा:- भारतीय क्रिकेट संघाला जगातील नंबर 1 क्रिकेट टीम बनवण्यात या 5 कोच चे मोलाचे योगदान, जाणून घ्या सविस्तर.
2019 पासून क्रिकेट मधून बाहेर:-
आपल्या मेहनती च्या जोरावर आर्यमन बिर्लाने क्रिकेटमध्ये मोठे यश प्राप्त केले . आर्यमन मध्य प्रदेशकडून प्रथम श्रेणी क्रिकेट खेळत. परंतु, 2019 नंतर त्याने क्रिकेटमधून अचानक ब्रेक घेतला आणि त्यानंतर त्याने क्रिकेटमध्ये पुनगारमन केले नाही. वयाच्या अवघ्या 22 व्या वर्षी आर्यमन बिर्लाने क्रिकेटमधून ब्रेक घेतला होता. मानसिक आरोग्याचे कारण देत आर्यमनने क्रिकेट सोडल्याचे बोलले जात आहे.
आर्यमन बिर्लाची संपत्ती:-
व्यावसायिक कुटुंब असलेल्या तसेच कुमार मंगलम बिर्ला यांचा मुलगा आर्यमन बिर्ला हा जवळपास 70,000 कोटी रुपयांचा मालक आहे शिवाय महागड्या गाड्या, राहणीमान आणि व्यवसाय असल्यामुळे जगातील सर्वात श्रीमंत खेळाडू बनला. या बाबतीत धोनी आणि कोहली ला सुद्धा मागे टाकले आहे.
आर्यमन बिर्लाची क्रिकेट कारकीर्द:-
आर्यमन बिर्ला ने 2017 साली मध्य प्रदेशसाठी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले हे उल्लेखनीय आहे. तो 2019 पर्यंत क्रिकेट खेळला. या काळात आर्यमनने 9 प्रथम श्रेणी आणि 4 लिस्ट-ए सामने खेळले. प्रथम श्रेणी सामन्यांच्या 17 डावांमध्ये, त्याने 28.60 च्या सरासरीने 514 धावा केल्या, ज्यामध्ये 108 सर्वोच्च धावा होत्या. याशिवाय आर्यमनने लिस्ट-ए च्या 3 डावात एकूण 44 धावा केल्या.
हे ही वाचा:- भारताच्या या 4 क्रिकेटर नी केले आहे आपले हेअर ट्रान्सप्लांट, भारताच्या या दिग्गज खेळाडूंचा समावेश.