उमरान मलिकच नाही, तर हे आहेत भारताचे खरे खुरे 5 वेगवान गोलंदाज,

0
5

 

 

भारतीय क्रिकेट संघाचा युवा वेगवान गोलंदाज उमरान मलिकने आपल्या वेगानं सर्वांना प्रभावित केलं आहे. उजव्या हाताच्या उमराणचा वेग सतत वाढत आहे. त्याने आपल्या छोट्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत अनेक टप्पे गाठले आहेत. उमरान हा भारताचा सर्वात वेगवान गोलंदाज आहे. सर्वात वेगवान चेंडू टाकणाऱ्या देशातील 5 गोलंदाजांबद्दल जाणून घेऊया.

 

22 वर्षीय वेगवान गोलंदाज उमरान मलिकने 2022 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. उमरान पदार्पणापासूनच त्याच्या वेगामुळे सतत चर्चेत असतो. या वर्षी भारत दौऱ्यावर आलेल्या श्रीलंका संघाविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या वनडे सामन्यात उमरानने ताशी १५५ किलोमीटर वेगाने चेंडू टाकून एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला. उमरान हा भारताचा सर्वात वेगवान गोलंदाज ठरला आहे.

Untitled design 16

 

या काळात उमरान मलिकने महान वेगवान गोलंदाज जवागल श्रीनाथचा विक्रम मोडला. श्रीनाथने 1999 च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत ताशी 154.5 किलोमीटर वेगाने चेंडू टाकला होता. त्यानंतर तो विश्वचषकातील दुसरा वेगवान गोलंदाज ठरला. उमरान आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादकडून खेळतो.

 

भारतीय क्रिकेट संघातील माजी खेळाडू तसेच ऑलराउंडर खेळाडू इरफान पठान च्या नावी अनेक रेकॉर्ड नोंदवले गेले आहेत. इरफान पठाण च्या नावी 153.7 किलोमिटर प्रती तास या स्पीड ने गोलंदाजी करण्याचा रेकॉर्ड आहे. इरफान पठाण च्या गोलंदाजीमुळे अनेक वेळा भारतीय क्रिकेट संघाला विजय मिळाला आहे. त्याचबरोबर टेस्ट मॅच मध्ये सलग 3 विकेट घेणारा एकमेव खेळाडू आहे.

 

हे ही वाचा:- भारतीय क्रिकेट संघात कोणत्या खेळाडूला सर्वाधिक मॅन ऑफ द मॅच मिळाले, जाणून घ्या विराट कोहली कितव्या स्थानी आहे.

 

 

 

टीम इंडियाचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीनेही ताशी 150 किलोमीटर वेगाने गोलंदाजी केली आहे. शमीने ताशी १५३.३ किलोमीटर वेगाने गोलंदाजी आहे. शमी सध्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफी अंतर्गत खेळल्या जाणाऱ्या देशांतर्गत कसोटी मालिकेत व्यस्त आहे.

images 25

भारतीय संघाबाहेर असलेल्या जसप्रीत बुमराहने ताशी 152.2 किलोमीटर वेगाने गोलंदाजी केली आहे. जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे टीम इंडियामध्ये आणि बाहेर आहे.100 हून अधिक कसोटी सामने खेळलेला अनुभवी वेगवान गोलंदाज इशांत शर्मा ताशी 152.6 किलोमीटर वेगाने गोलंदाजी करतो. 152.5 च्या वेगाने गोलंदाजी करण्याचा विक्रम वरुण आरोनच्या नावावर आहे, तर उमेश यादवच्या नावावर ताशी 152.2 किलोमीटर वेगाने गोलंदाजी करण्याचा विक्रम आहे.

 

 

हे ही वाचा:- क्रिकेट सोबतच हे 4 खेळाडू करत आहेत सरकारी नोकरी, जाणून घ्या कोण कोणत्या पोस्ट वर कार्यरत आहे.

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here