ही आहेत भारतीय क्रिकेट खेळाडूंची रेकॉर्ड, जी आजपर्यंत कोणतीच तोडू शकत नाही.
क्रिकेट हा आपल्या देशाचा राष्ट्रीय खेळ नसला तरी लाखो चाहते आपल्या देशात क्रिकेट चे आहे तसेच भारतीय क्रिकेट संघ हा जगात सर्वात श्रेष्ठ क्रिकेट संघ म्हणून ओळखला जातो. पूर्वीपासूनच अनेक भारतीय खेळाडूंनी अशी रेकॉर्ड बनवली आहेत जी आजपर्यंत कोणीच तोडू शकत नाही.
तर मित्रांनो आज आम्ही या लेखात अश्या रेकॉर्ड विषयी सांगणार आहे जी भारतीय खेळाडूंनी बनवली आहेत. आणि आजपर्यंत ही रेकॉर्ड कोणीच मोडू शकले नाही.
T2 क्रिकेट मध्ये सर्वाधिक वेळा 50 पेक्षा जास्त धावा काढणे:-
T20 क्रिकेट मध्ये सर्वाधिक वेळा फलंदाजी करत 50 पेक्षा जास्त धावा विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी केल्या आहेत. या दोन्ही भारतीय खेळाडूंनी 30 पेक्षा जास्त वेळा T20 क्रिकेट मध्ये 50 पेक्षा जास्त धावा काढल्या आहेत.
वन डे क्रिकेट मध्ये सर्वात जास्त वेळा 50 धावा काढणे:-
वन डे क्रिकेट मध्ये सर्वाधिक जास्त धावा काढणे खूप कठीण असते हे तुम्हाला माहीतच असेल. आतंरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये सचिन तेंडुलकर ने 145 वेळा वन डे क्रिकेट मध्ये 50 पेक्षा जास्त धावा काढल्या आहेत. सचिन तेंडुलकर चे हे रेकॉर्ड आजपर्यंत कोणीच मोडू शकले नाही.
T20 क्रिकेट मध्ये सर्वाधिक जास्त शतक:-
T20 क्रिकेट मध्ये सर्वाधिक शतक झळकावणारा खेळाडू हा रोहित शर्मा आहे. रोहित शर्मा ने T 20 क्रिकेट मध्ये 4 शतक झळकावली आहेत. त्यामुळे हे रेकॉर्ड तोडणे खूप अवघड आहे.
वन डे क्रिकेट मध्ये सर्वाधिक शतक:-
आंतरराष्ट्रीय वन डे क्रिकेट मध्ये सर्वाधिक शतक मारणारा खेळाडू हा सचिन तेंडुलकर आहे. सचिन तेंडुलकर ने वन डे क्रिकेट मध्ये आतापर्यंत 49 शतके मारली आहेत. आणि सचिन तेंडुलकर चा हा रेकॉर्ड मोडले खूप अवघड आणि कठीण आहे.

वन डे क्रिकेट मध्ये सर्वाधिक धावा:-
वन डे क्रिकेट मध्ये सर्वाधिक धावा बनवणारा खेळाडू हा सचिन तेंडुलकर आहे. सचिन तेंडूलकर ने आपल्या आतंरराष्ट्रीय वन डे क्रिकेट करियर मध्ये 18426 धावा बनवल्या आहेत.