आयसीसी विश्वचषक 2023 स्पर्धा मोठ्या उत्साहात भारतात सुरु आहेत. एकीकडे विश्वचषक स्पर्धेत अनेक उलटफेअर पाहायला मिळतात तर दुसरीकडे भारतात देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेमध्ये काही भारतीय खेळाडू धमकीदार कामगिरी करत असल्याचे दिसून येत आहे. भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार याला परफॉर्मन्स खराब असल्यामुळे भारतीय संघात स्थान मिळवता आले नाही. मात्र देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याने आपल्या गोलंदाजीने सर्वांनाच प्रभावित केले आहे.
सय्यद मुश्ताक अली टी 20 स्पर्धेमध्ये त्याने कर्नाटक संघाविरुद्ध खेळत असताना 3.3 षटकात 16 धावा देत 5 गडी बाद केले आहेत. भुनेश्वरने सामन्यात धारदार गोलंदाजी करत कर्नाटकच्या फलंदाजांना सळो की पळो करून सोडले. भुनेश्वरने सतराव्या षटकात गोलंदाजी करण्यासाठी आला तेव्हा त्याने पहिल्या तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर विकेट मिळवली. त्यानंतर 19 व्या शतकात तो पुन्हा गोलंदाजी करण्यासाठी आला. यात त्याने पहिल्या आणि तिसऱ्या चेंडूवर विकेट मिळवत उत्तर प्रदेशच्या संघाला विजय मिळवून दिला. त्याआधी त्रिपुराविरुद्धच्या झालेल्या सामन्यात देखील त्याने दोन विकेट घेतले होते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच्या खराब परफॉर्मन्समुळे त्याला संघाबाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.
भुनेश्वर कुमारने 2022 मध्ये न्युझीलँडविरुद्ध नेपियर येथे झालेल्या टी-ट्वेंटी सामन्यात अखेरचा सामना खेळला होता. 2023 मध्ये आयपीएल मध्ये फ्रेंचाईजी टीम हैदराबादच्या संघाकडून त्याने 14 सामन्यात 16 विकेट घेतले होते. एकेकाळी भुवनेश्वर कुमार हा भारतीय संघाच्या गोलंदाजाचे नेतृत्वाची धुरा सांभाळत होता. मोहम्मद शमी, सिराज, बुमराह या भारतीय गोलंदाजाच्या त्रिकूटाने दमदार कामगिरी केल्यामुळे भुवनेश्वर कुमारचा संघातला पत्ता कट झाला.
भुनेश्वर कुमारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीवर एक नजर टाकले असता त्याने 121 सामन्यात 141 विकेट घेतले आहेत. तर 21 कसोटी सामन्यात त्याच्या नावावर 63 बळीची नोंद आहे.
या सामन्यात उत्तर प्रदेशने प्रथम फलंदाजी करताना 197 धावांचे आव्हान कर्नाटक पुढे ठेवले होते. मात्र कर्नाटकचा संघ 156 धावांवर गारद झाला. भुनेश्वर कुमारच्या या धारदार गोलंदाजीच्या जोरावर भारतीय संघाने हा सामना 40 धावांनी जिंकला. शमी, सिराज, बुमराह हे भारतीय गोलंदाज दमदार ललित असल्याने त्याचे संघात पुनरागमन होणे अवघड झाले आहे. हार्दिक पांड्या बंगलादेशविरुद्धच्या सामन्यांमध्ये अनफिट झाल्यानंतर भुवनेश्वर कुमार ला संघात घेतले जाईल असे बोलले जात होते मात्र ही आशा देखील धुसर ठरली. वर्ल्ड कप खेळण्यांचे त्याचे स्वप्न जवळपास स्वप्नच राहिले. त्याचे भविष्यात देखील कमबॅक होणे अवघड आहे.