INDU19 vs PAKU19: पाकिस्तानविरुद्ध अपयशी ठरला 13 वर्षाचा वैभव सूर्यवंशी, काढू शकला फक्त 1 धाव…

INDU19 vs PAKU19: सध्या U19 आशिया चषक 2024 (U-19 Asia Cup 2024) स्पर्धा खेळवली जात आहे. या स्पर्धेतील तिसराच सामना कट्टर प्रतीस्पर्धी मानल्या जात असलेल्या भारत आणि पाकिस्तान (INDU19 vs PAKU19) यांच्यात आज दुबईच्या स्टेडियमवर खेळवला जात आहे.

  INDU19 vs PAKU19: पाकिस्तानविरुद्ध अपयशी ठरला 13 वर्षाचा वैभव सूर्यवंशी, काढू शकला फक्त 1 धाव...
Image Courtesy: TEAM INDIA U19

या सामन्यासाठी भरतीय संघात आयपीएल लिलावामध्ये स्टार ठरलेला 13 वर्षाचा वैभव सूर्यवंशी याचा देखील समावेश आहे.

IPL 2025 च्या मेगा लिलावात वयाच्या अवघ्या 13 व्या वर्षी करोडपती बनलेला वैभव सूर्यवंशी (Vaibhav Suryavanshi)पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात छाप पाडू शकला नाही. कट्टर प्रतिस्पर्धी देशाविरुद्धच्या ACC अंडर-19 आशिया चषकात वैभव केवळ एक धाव घेत 9 चेंडूंचा सामना करून पॅव्हेलियनमध्ये परतला.

लांबलचक षटकार मारण्यासाठी प्रसिद्ध असलेला वैभव पाकिस्तानच्या गोलंदाजांचीही गंभीर दखल घेईल, अशी सर्वांना अपेक्षा होती. मात्र, या संधीचे सोने करण्यात वैभव अपयशी ठरला.

INDU19 vs PAKU19:  वैभव सूर्यवंशी पाकिस्तानविरुद्ध फ्लॉप ठरला,काढली फक्त एक धाव.

पाकिस्तानने दिलेल्या २८२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी भारताची आयुष म्हात्रे आणि वैभव सूर्यवंशी ही सलामी जोडी मैदानात उतरली. आयुषने सुरुवातीला काही दमदार शॉट्स मारले, मात्र तो 20 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला

.   INDU19 vs PAKU19: पाकिस्तानविरुद्ध अपयशी ठरला 13 वर्षाचा वैभव सूर्यवंशी, काढू शकला फक्त 1 धाव...

दुसऱ्या टोकाला उभा असलेला त्याचा जोडीदार वैभव याला पाकिस्तानविरुद्ध फटकेबाजी करत नाव कमावण्याची मोठी संधी होती. मात्र, वैभवला या संधीचा फायदा उठवता आला नाही. 9 चेंडूंचा सामना केल्यानंतर वैभवच्या खात्यात एकच धाव आली. अली रझाने भारतीय सलामीवीराला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.

इकडे युझवेंद्र चहलला लिलावात मिळाले 18 कोटी आणि तिकडे पत्नी धनश्रीला मिळाला तिचा पहिला चित्रपट, धनश्री वर्मा ‘या’ दिवशी करणार फिल्म इंडस्ट्रीमध्ये पदार्पण…

  INDU19 vs PAKU19: वैभव सूर्यवंशी ठरला आयपीएलच्या इतिहासात सर्वांत लहान महागडा खेळाडू.

IPL 2025 च्या मेगा लिलावात वैभव सूर्यवंशीने इतिहास रचला. या लीगच्या मेगा लिलावात विकला जाणारा तो सर्वात तरुण खेळाडू ठरला. वैभवासाठी राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात चुरशीची लढत झाली. मात्र, अखेरीस राजस्थानने बिहारच्या लालसाठी 1.10 कोटींची बोली लावली आणि त्याला आपल्या संघात समाविष्ट केले.

वैभव हा डावखुरा फलंदाज असून तो त्याच्या तुफानी फलंदाजीसाठी ओळखला जातो. मात्र, पाकिस्तानविरुद्ध वैभवची बॅट शांत राहिली.

 INDU19 vs PAKU19 सामन्याचे अपडेट.

प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 7 गडी गमावून 281 धावा केल्या. संघाच्या वतीने शाहजेब खानने शानदार फलंदाजी करत शतक झळकावले. त्याने 147 चेंडूंचा सामना करत 159 धावा केल्या.

या खेळीदरम्यान शाहजेबने 5 चौकार आणि 10 गगनचुंबी षटकार ठोकले. त्याचवेळी उस्मान खाननेही भारतीय गोलंदाजांचा  समाचार 60 धावांची दमदार खेळी केली. या दोघांनी मिळून पहिल्या विकेटसाठी 160 धावांची भागीदारी केली. आता हा सामना कोण जिंकतो हे  काही वेळात कळेलच.


हे ही वाचा:- 

IPL 2025: यंदा च्या सिझन मध्ये ठरणार हा सर्वात महागडा खेळाडू, हरभजन सिंग ने केली भविष्यवाणी.

PL 2025: रोहित शर्मा RCB मध्ये सामील होणार? AB डिविलियर्सचं विधान.