INDvsENG lIVE: ख्रिस जोर्डनचा ‘सटीक’ योर्कर, विराट कोहली चक्क तोंडावर आपटला, व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल..
टी-२० विश्वचषकाचा दुसरा सेमीफायनल सामना आज इंग्लंड आणि भारत यांच्यात एडीलेटमध्ये खेळवला जात आहे. इंग्लडने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांच्या गोलंदाजांनी हा निर्णय
खरा ठरवला. भारतीय संघाचे ग सलामीवर रोहित शर्मा आणि के.एल. राहुल मैदानावर येताच भारतीय फलंदाजांना फलंदाजी करण्यात अडचण दिसत होती. त्याचाच फायदा घेत क्रिस ओक्सने सलामीवर राहुलला बाद केले. फक्त ५ धावा काढून सलामीवर लोकेश राहुल बाद झाल्यावर चाहते राहुलवर चांगलेच रागावले आहेत. सोशल मिडीयावर राहुल ट्रोल व्हायला सुरवात झालीय.
भारतीय संघाचे खेळाडू एकामागे एक बाद होत असतांना दुसऱ्या बाजूने मात्र पुन्हा एकदा विराट कोहली संघासाठी धावा काढतोय. सुर्यकुमार यादव बाद झाल्यानतर फलंदाजीसाठी हार्दिक पंड्या आला आणि विरत सोबत पार्टनरशिप करण्याचा प्रयत्न केला जातोय.
मात्र यादरम्यानच १६व्या षटकात अस काही घडले कि ते पाहून मैदानावरील सर्वच जन आच्छर्यचकित झाले.
नक्की काय झाले १६ व्या षटकात? जाणून घ्या सविस्तर.

तर झालं अस की, १६ व्या षटक टाकण्याची जबाबदारी इंग्लंडचा का कर्णधार जॉस बटलरने ख्रिस जोर्डनला दिली. आणि जोर्डनने आपल्या चौथ्या चेंडूवर भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीला थेट गुढघ्यावर आणले. त्याने टाकलेला योर्कर चेंडू थेट विराटच्या पायावर लागला आणि विराटचे बेलेंस बिघडून विराट गुढघ्यावर पडला. त्यांतर इंग्लंडच्या संघाने पायचीत बाद साठी अपील केली मात्र पंचानी नाबाद दिले. त्यानंतर कर्णधार जॉस बट्लरने DRS घेतला मात्र त्यात सुद्धा अंपायर कॉल दिल्याने विराट कोहलीनाबाद राहिला.
हा व्हिडीओ काही वेळातच सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. भारतीय संघ सध्या खेळत असून भारताचे १८ व्या षटकात १३५ वर ३ गडी बाद झाले आहेत.
हेही वाचा:
पाकिस्तानच्या विजयानंतर भारतीय संघात होणार 3 मोठे बदल, असा असेल इंग्लंडविरुद्ध भारतीय संघ…
या कारणांमुळे पंजाब किंग्सने मयंक अगरवालचा पत्ता केला कट, आता हा खेळाडू झाला पंजाब किंगचा कर्णधार..