INDvsSL LIVE: श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात कर्णधार ‘हार्दिक पांड्या’ मोडू शकतो हा मोठा विक्रम, फक्त एवढ्या धावा केल्यास युवराज सिंहचा हा मोठा विक्रम मोडणार हार्दिक..
भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-२० मालिकेचा पहिला सामना आज खेळवला जाणार आहे. नववर्षातील टीम इंडियाचा हा पहिलाच सामना असेल त्यामुळे हा सामना जिंकून 2023 ची सुरवात विजयाने करण्याचा निछ्यय टीम इंडियाने केलाय.
यासोबतच या मालिकेसाठी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि आणि सलामीवीर केएल राहुल उपलब्ध नसणार नाहीत. त्याएवजी कर्णधार पदाची जिम्मेदारी हार्दिक पंड्यावर आहे. या मालिकेत जबरदस्त कामगिरी केल्यास हार्दिक पंड्या टीम इंडियाचा कायमचा टी-२० कर्णधार होऊ शकतो.
View this post on Instagram
भारताचा स्थायी कर्णधार आणि अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याला मंगळवारी (३ जानेवारी) मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात युवराज सिंगला मागे सोडण्याची संधी असेल.

या सामन्यात हार्दिक पांड्याने 18 धावा केल्या तर तो युवराजला मागे टाकून टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा आठवा खेळाडू ठरेल. हार्दिकने आतापर्यंत 81 सामन्यांच्या 61 डावांमध्ये 1160 धावा केल्या आहेत. त्याचवेळी युवराजने भारतासाठी या फॉरमॅटमध्ये 58 सामन्यांच्या 51 डावांमध्ये 1177 धावा केल्या.
या मालिकेत नियमित कर्णधार रोहित शर्माला विश्रांती देण्यात आली आहे. त्याच्या अनुपस्थितीत हार्दिककडे संघाची कमान सोपवण्यात आली आहे. त्यामुळे या सामन्यात हार्दिक आणि टीम इंडिया कशी कामगिरी करते, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.