INDW vs ENGW: भारतीय महिला संघाने रचला इतिहास, कसोटीच्या पहिल्याच दिवशी ठोकल्या 410 धावा, इतिहासात पहिल्यांदाच महिला संघाने केला ‘हा’ मोठा विक्रम.

INDW vs ENGW: भारतीय महिला संघाने रचला इतिहास, कसोटीच्या पहिल्याच दिवशी ठोकल्या 410 धावा, इतिहासात पहिल्यांदाच महिला संघाने केला 'हा' मोठा विक्रम.

INDW vs ENGW:  मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडियमवर भारतीय महिला संघ आणि इंग्लंड महिला संघ यांच्यात कसोटी सामना खेळला जात आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा टीम इंडियाची धावसंख्या 7 गड्यांच्या मोबदल्यात 410 धावा आहे. याआधी टीम इंडियाची कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली नाही. सलामीवीर स्मृती मानधना १७ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतली. त्यावेळी भारताची धावसंख्या 25 धावा होती. यानंतर शेफाली वर्मा केट क्रॉसच्या चेंडूवर 19 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतली.

INDW vs ENGW: महिला क्रिकेटमध्ये टीम इंडियाच्या 4 फलंदाजांनी  एकापाठोपाठ ठोकले अर्धशतके.

47 धावांपर्यंत टीम इंडियाचे दोन्ही सलामीवीर पॅव्हेलियनमध्ये गेले होते. मात्र यानंतर जेमिमाह रॉड्रिग्स आणि शुभा सतीश यांच्यात चांगली भागीदारी झाली. दोन्ही खेळाडूंनी तिसऱ्या विकेटसाठी 115 धावांची भागीदारी केली. शुभा सतीशने 69 धावा केल्या. तर जेमिमाह रॉड्रिग्ज लॉरेन बेलच्या चेंडूवर ६९ धावा करून बाद झाली. यानंतर टीम इंडियाची कर्णधार हरमनप्रीत कौर 49 धावा करून धावबाद झाली. यास्तिका भाटियाने 88 चेंडूत 66 धावा केल्या.

INDW vs ENGW: टीम इंडियाच्या 4 फलंदाजांनीठोकले अर्धशतक

INDW vs ENGW: भारतीय महिला संघाने रचला इतिहास, कसोटीच्या पहिल्याच दिवशी ठोकल्या 410 धावा, इतिहासात पहिल्यांदाच महिला संघाने केला 'हा' मोठा विक्रम.

भारताकडून अष्टपैलू दीप्ती शर्मा 60 धावा करून नाबाद परतली. स्नेह राणाने 30 धावा केल्या. दिवसाचा खेळ संपण्यापूर्वी स्नेह राणाला नॅट सीव्हर ब्रंटने बोल्ड केले. सध्या भारताकडून दीप्ती शर्मा आणि पूजा वस्त्राकर क्रीजवर आहेत. पहिल्या दिवशी भारतासाठी 4 फलंदाजांनी अर्धशतक केले. मात्र, टीम इंडियाची कर्णधार हरमनप्रीत कौर 49 धावांवर धावबाद झाली, त्यामुळे तिला पन्नास धावांचा टप्पा गाठता आला नाही.

दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारतीय संघ 7 गडी गमावून 410 धावा बोर्डवर लावण्यात यशस्वी ठरला. भारतीय संघासाठी ही चांगली सुरवात मानली जात आहे.


हेही वाचा:

IPL AUCTION 2024: आई शेतमजूर तर बाप बांधकाम मजूर.. आयपीएलच्या मिनी लिलावात बिहारच्या ‘या’ तरुणाची चर्चा; धोनीला मानतो आदर्श..

IPL RECORD: आयपीएलमध्ये ‘या’ 4 फलंदाजांनी शेवटच्या षटकात काढल्यात सर्वाधिक धावा, यादीमध्ये एकमेव विदेशी खेळाडू..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *