आयपीएल 2024 (IPL 2024) स्पर्धेला धुमधडाक्यात सुरुवात झाली आहे. जसजसे सामने पुढे होत जातील तसतसे अधिक रोमांचक सामने पाहायला मिळत आहेत. काही एकीकडे काही खेळाडू नवनवीन विक्रम रचत आहेत तर दुसरीकडे काही खेळाडू स्पर्धेतून बाहेर पडत आहेत. नुकतीच सनरायझर्स हैदराबाद संघासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. हैदराबाद संघातील सदस्य श्रीलंकेचा स्टार फिरकीपटू वानिंदु हसरांगा हा अद्यापही संघात दाखल झाला नाही. सध्या तो टाचेच्या दुखापतीने त्रस्त आहे. त्यामुळे तो संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडू शकतो.
वानिंदू हसरंगा याचा मॅनेजर क्रिकबज बोलताना म्हणाले की,
तो मेडिकल चेकअपसाठी दुबईला जाणार आहे. सध्या तो बांगलादेश विरुद्ध सुरू असलेल्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत श्रीलंका संघात खेळत आहे. ही मालिका संपल्यानंतर तो थेट तो भारतात दाखल होईल. यावरून असे लक्षात येते की, तो आयपीएलमध्ये खेळणार आहे. मात्र त्यासाठी अजून काही दिवसांची वाट पहावी लागणार आहे.
सनरायझर्स हैदराबाद संघाने त्याला दीड कोटी रुपयांमध्ये विकत घेतले होते. हसरंगा यापूर्वी दोन हंगाम रॉयल चॅलेंजर्स बंगळूर संघाकडून खेळला होता. हसरंगा हा आपल्या दुखापतीवर लक्ष ठेवून आहे. यासाठी तो विशेष काळजी घेत आहे. कारण तो श्रीलंकेचा टी 20 संघाचा कर्णधार आहे.
आयपीएल 2024 मध्ये सनरायझर्स हैदराबाद संघाच्या कामगिरी बाबतीत बोलायचे झाले तर आतापर्यंत या संघाने दोन सामने खेळले आहेत. यात पहिल्या सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात त्यानी 20 षटकात 277 धावा केल्या होत्या. त्यात त्यांना 31 धावांनी विजय मिळवता आला. या विजयासह त्यांच्या खात्यात दोन गुणाची कमाई झाली आहे. त्यांचा तिसरा सामना गुजरात टायटन्स विरुद्ध 31 मार्च रोजी होणार आहे.
====
आमचे ईतर लेख आणि ट्रेंडीग बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.