आपल्या संपूर्ण क्रिकेट कारकिर्दीमध्ये ‘या’ 5 गोलंदाजांनी एकही नो बॉल फेकला नाही, केवळ या खेळाडूंच्याच नावावर आहे हा अनोखा विक्रम..

आपल्या संपूर्ण क्रिकेट कारकिर्दीमध्ये 'या' 5 गोलंदाजांनी एकही नो बॉल फेकला नाही, केवळ या खेळाडूंच्याच नावावर आहे हा अनोखा विक्रम..

क्रिकेटच्या नियमांनुसार जेव्हा गोलंदाजाचा पाय काढलेल्या रेषेत सापडत नाही तेव्हा त्याला नो बॉल म्हणतात. क्रिकेटमध्ये नो बॉलला खूप महत्त्व आहे, कारण सामन्याच्या निकालावर किती वेळा नो बॉलचा परिणाम झाला कुणास ठाऊक. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील 2016 च्या टी-20 विश्वचषकाची उपांत्य फेरी असो किंवा 2017 ची चॅम्पियन्स ट्रॉफीची अंतिम फेरी, जिथे एका नो बॉलने सामन्याचे  चित्रच बदलले होते.

याउलट तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की , अंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असेदेखील  गोलंदाज देखील आहेत ज्यांनी त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत एकही नो बॉल टाकला नाही. या फिचरमध्ये आम्ही अशा 5 गोलंदाजांबद्दल बोलणार आहोत ज्यांच्या नावावर हा अनोखा विक्रम नोंदवला गेला आहे. चला तर जाणून घेऊया कोण आहेत ते गोलंदाज.

 

आपल्या संपूर्ण क्रिकेट कारकिर्दीमध्ये 'या' 5 गोलंदाजांनी एकही नो बॉल फेकला नाही, केवळ या खेळाडूंच्याच नावावर आहे हा अनोखा विक्रम..

1. इयान बोथम

इंग्लंडचे महान अष्टपैलू सर इयान बॉथम यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक विश्वविक्रम केले आहेत. बॅट आणि बॉल या दोन्ही बाबतीत चमकदार कामगिरी करणारा बोथम हा अशा गोलंदाजांपैकी एक आहे ज्यांनी 112 कसोटी आणि 116 एकदिवसीय सामने खेळूनही आपल्या संपूर्ण कारकिर्दीत एकही नो-बॉल टाकला नाही. कसोटीत 383 आणि एकदिवसीय सामन्यात 145 बळी घेणारा बोथम हा अष्टपैलू खेळाडू म्हणून अतिशय उत्कृष्ट होता.

2. इम्रान खान

Imran Khan: इमरान खान के 4 ऐसे रिकार्ड्स, जिनको चकनाचूर कर पाना है नामुमकिन - pakistan ex captain imran khan hold 4 unbreakable records - Navbharat Times

1992 च्या विश्वचषकात आपल्या नेतृत्वाखाली पाकिस्तानला प्रथमच विश्वविजेते बनविणाऱ्या इम्रान खानने आपल्या कारकिर्दीत अनेक यश संपादन केले. कसोटी आणि एकदिवसीय अशा एकूण 544 विकेट्स आपल्या नावावर करणारा इम्रान हा अशा गोलंदाजांपैकी एक आहे ज्याने आपल्या कारकिर्दीत एकही नो बॉल टाकलेला नाही.

3. ग्रॅम स्वान

इंग्लंडचा फिरकी गोलंदाज ग्रॅमी स्वान अशा गोलंदाजांपैकी एक आहे ज्यांच्या नावावर हा अनोखा विक्रम नोंदवला गेला आहे. इंग्लंडकडून 60 कसोटी आणि 79 वनडे खेळलेल्या स्वानने आपल्या कारकिर्दीत कधीही नो बॉल टाकला नाही. 2010 मध्ये इंग्लंडला T20 विश्वचषक जिंकून देण्यात स्वानने महत्त्वाची भूमिका बजावली होती आणि तो इंग्लिश संघासाठी सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज होता.

4. डेनिस लिली

1970-80 च्या दशकात असे काही वेगवान गोलंदाज होते ज्यांच्या विरोधात फलंदाजांनी धावा करण्यापेक्षा स्वतःचे संरक्षण करण्याचा प्रयत्न केला, डेनिस लिली हे त्या वेगवान गोलंदाजांपैकी एक होते. ऑस्ट्रेलियाच्या या फास्ट बॉलरच्या ज्वलंत चेंडूंना मोठे फलंदाज घाबरले होते. 1971 ते 1984 दरम्यान, डेनिस लिलीने 70 कसोटी सामन्यांमध्ये 355 विकेट्स घेतल्या.

कसोटी क्रिकेटमध्ये 350 बळी घेणारा लिली हा पहिला गोलंदाज होता. अत्यंत वेगवान गोलंदाजी करूनही, लिलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कधीही नो बॉल टाकला नाही. मात्र, वेळोवेळी दुखापतींमुळे डेनिस लिलीची कारकीर्द फार काळ टिकली नाही.

आपल्या संपूर्ण क्रिकेट कारकिर्दीमध्ये 'या' 5 गोलंदाजांनी एकही नो बॉल फेकला नाही, केवळ या खेळाडूंच्याच नावावर आहे हा अनोखा विक्रम..

5. लान्स गिब्स

300 बळींचा टप्पा गाठणारा पहिला फिरकी गोलंदाज लान्स गिब्स हा अशा गोलंदाजांपैकी एक आहे ज्यांच्याकडे एकही नो बॉल न टाकण्याचा अनोखा विक्रम आहे. वेस्ट इंडिजच्या सर्वात यशस्वी फिरकी गोलंदाजांपैकी एक असलेल्या लान्सने आपल्या कारकिर्दीत एकूण 79 कसोटी सामने खेळले आणि 309 बळी घेतले. लान्स गिब्सने वयाच्या 41 व्या वर्षी कसोटी क्रिकेटमध्ये 300 बळी पूर्ण केले.


हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *