क्रीडाताज्या घडमोडी

IPL 2023: आयपीएलआधीच मुंबई इंडियन्सला आणखी एक मोठा धक्का… 1.5 करोड रुपयांना खरेदी केलेला हा खेळाडू हॉस्पिटलमध्ये दाखल , आयपीएल 2023 मधून होऊ शकतो बाहेर..

ipl 2023: jhye richardson ruled out from ipl 2023

IPL 2023: आयपीएलआधीच मुंबई इंडियन्सला आणखी एक मोठा धक्का… 1.5 करोड रुपयांना खरेदी केलेला हा खेळाडू हॉस्पिटलमध्ये दाखल , आयपीएल 2023 मधून होऊ शकतो बाहेर..


इंडियन प्रीमियर लीगच्या 16व्या हंगामाआधीच मुंबई इंडियन्स संघाला सातत्याने धक्के बसत आहेत. भारतीय गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे आयपीएल 2023 मधून बाहेर पडला आहे, तर आता ऑस्ट्रेलियन गोलंदाज झ्ये रिचर्डसन देखील लीगमधून बाहेर पडण्याची शक्यता आहे.

 रिचर्डसनने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे,ज्यात तो हॉस्पिटलमध्ये भरती असल्याचे दिसतंय.

 

मुंबई इंडियन्सने 2023 साठी रिचर्डसनला रिटेन केले होते. पण मुंबईला एकामागून एक धक्के बसत आहेत. आधी बुमराह आणि आता रिचर्डसनची उणीव मुंबईला आयपीएलच्या 16 व्या मोसमात नक्कीच महागात पडेल.

 

View this post on Instagram

 

A post shared by @jhye.richardson

खरंतर, झ्ये रिचर्डसनने एक पोस्ट शेअर केली आहे ज्यामध्ये तो हॉस्पिटलच्या बेडवर पडलेला दिसत आहे. यादरम्यान, त्याने फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, “दुखापत हा क्रिकेटचा एक मोठा भाग आहे, ही वस्तुस्थिती आहे. गेली काही वर्षे कठीण गेली. पण आता सुदैवाने मी या टप्प्यात आहे, चांगल्या स्थितीत येण्यासाठी मी खूप मेहनत घेत आहे. निराश, नक्कीच, परंतु भविष्यात काय आहे हे पाहण्यासाठी उत्सुक आहे? पुन्हा मैदानात उतरून चांगले क्रिकेट खेळण्यासाठी स्वत:ला तयार करत आहे. एक पाऊल मागे, दोन पावले पुढे.”

त्याने सोशल मिडीयावर केलेली ही पोस्ट  मुंबई इंडियन्सने  सुद्धा लाईक केली आहे. आणि रिचर्डसनला लवकरात लवकर बारे होण्यासाठी प्रार्थना केली आहे.

आयपीएल

भारताविरुद्धच्या वनडे मालिकेतूनही बाहेर… ( jhye richardson ruled out from IND vs AUS odi Series)

 

उल्लेखनीय म्हणजे, 4 जानेवारीला हॅमस्ट्रिंग ओढल्यापासून रिचर्डसन खेळला नव्हता. झ्ये रिचर्डसनने अनेक प्रसंगी चमकदार गोलंदाजी करून ऑस्ट्रेलियासाठी सामने जिंकले आहेत. पण आता ऑस्ट्रेलियाला त्याची उणीव नक्कीच भासेल. यासोबतच रिचर्डसन भारताविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतूनही बाहेर झाला आहे.


हे ही वाचा..

रोहितने ODI क्रिकेटमधून कर्णधारपद सोडल्यास केएल राहुल नव्हे तर ‘हा’ खेळाडू होऊ शकतो पुढील कर्णधार

चेतेश्वर पुजाराचा भीम पराक्रम! प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये असा कारनामा करणारा ठरलाय केवळ दुसरा फलंदाज…

Ranji Trophy – सरफराज खानची खेळी व्यर्थ! दिल्लीचा मुंबईवर तब्बल ४२ वर्षांनंतर विजय…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
TEAM INDIA के प्लेअर्स ने खेली होली, बीसीसीआय ने शेअर किये PHOTO IRAL अभिनेत्री मृणाल ठाकूरच्या सुंदर अदानी लुटली मेहफिल, पहा PHOTO 3 indian player who cant play against shrilanka in odi series VIRAL PHOTO:अभिनेत्री तमन्ना भाटीयाचा रेड ड्रेसमध्ये बोल्ड लुक! महिला क्रिकेटपटू स्मृती मानधनाच्या ट्रेडीशनल लुकवर चाहते फिदा,