IPL 2023 MINI AUCTION LIVE: सॅम करण ठरला आयपीएलच्या आजवरच्या इतिहासातील सर्वांत महागडा खेळाडू, या संघाने त्याच्यासाठी मोजले तबल एवढे कोटी.. ..
आयपीएल 2023 चे मिनी ऑक्शन आज कोची इथे सुरु झाले आहे. यंदाच्या आयपीएलसाठी 400 हून अधिक युवा आणि अनुभवी खेळाडूंनी आपले नाव नोंदवले आहे. बोलीच्या सुरवातीलाच हैद्राबाद संघाचा माजी कर्णधार केन विल्यमसनचे नाव पुढे आले. आणि त्याच्यावर बोली लावली गेली.
सलामीवर फलंदाजांवर बोली लावून झाल्यानंतर 5 अष्टपैलू खेळाडूंवर बोली लावण्यात येणार आहे. ज्यात सॅम करणचे नाव वर आले. गेल्या वर्षी चेन्नई सुपर किंग्सचा हिस्सा असलेल्या करण यावर्षी चेन्नईने रिलीज केल्यामुळे या लिलावाचा हिस्सा बनला होता. त्याचे नाव उच्चारताच जवळपास सर्वच संघांमध्ये त्याच्यासाठी बोली लावण्याचीस्पर्धा सुरु झाली. शेवटपर्यंत चाललेल्या या लढाईमध्ये पंजाब आणि मुंबई दोघानी शेवटपर्यंत लढाई केली.
मात्र पंजाब किंग्सने ही स्पर्धा जिंकली आणि त्याला तब्बल 18.50 कोटी रुपये मोजून संघात दाखल करून घेतले .
OH YES!!!
Break the BANK! 💰💰
Sam Curran is SOLD for a whopping INR 18.50 Crore to the PUNJAB KINGS #TATAIPLAuction | @TataCompanies
— IndianPremierLeague (@IPL) December 23, 2022