IPL 2023 MINI AUCTION LIVE: पहिला खेळाडू 2 कोटीला तर दुसरा युवा खेळाडू विकला गेला 13 कोटी 25 लाखाला, जाणून घ्या कोनता खेळाडू कोणी घेतला विकत आणि किंमत..
आयपीएल 2023 चे मिनी ऑक्शन आज कोची इथे सुरु झाले आहे. यंदाच्या आयपीएलसाठी 400 हून अधिक युवा आणि अनुभवी खेळाडूंनी आपले नाव नोंदवले आहे. बोलीच्या सुरवातीलाच हैद्राबाद संघाचा माजी कर्णधार केन विल्यमसनचे नाव पुढे आले. आणि त्याच्यावर बोली लावली गेली.
केन विल्यमसन: सुरवातीलाच नाव आल्यामुळे त्याच्यावर कुणीही बोली लावली नाही मात्र शेवटच्या वेळी गुजरात संघाने त्याला त्याच्या बेस प्राईस मध्ये म्हणजेच 2 करोड मध्ये आपल्या संघात सामील करून घेतले आहे.
हैरी ब्रूक्स : तर दुसऱ्या नंबरवर बोली लागलेला खेळाडू हैरी ब्रूक्स वर 13 करोड 25 लाखांची बोली लावून सनरायजजर्सने आपल्या संघात दाखल करून घेतले आहे. इंग्लंडच्या या युवा खेळाडूने आपल्या कौशल्याने सर्वांनाच चकित केले होते. त्यामुळे जवळपास सर्वच संघ त्याच्यावर बोली लावण्यास उत्सुक होते.
What do you make of this buy folks? 💰💰
Congratulations to Harry Brook who joins @SunRisers #IPLAuction | @TataCompanies pic.twitter.com/iNSKtYuk2C
— IndianPremierLeague (@IPL) December 23, 2022
मयंक अगरवाल: पंजाब किंग्स संघाचा माजी कर्णधार मयंक अगरवालला पंजाबने सोडल्यामुळे तोसुद्धा या लिलावात सहभागी झाला होता. त्याच्यावर सुद्धा सर्वच खेळाडूंनी बोली लावली आहे. त्याला सुद्धा सनरायजर्स हैद्राबादने 8.25 कोटीला आपल्या संघात दाखल करून घेतले.

आयपीएलच्या लिलावाचे ताजे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या पेजला नक्की भेट द्या.