IPL 2023: यंदा ‘पर्पल कॅप’ मिळवने सोप नाय गड्या… पर्पल कॅप मिळवण्यासाठी यावर्षी या 5 गोलंदाजामध्ये होऊ शकते काटे कि टक्कर….

IPL 2023: यंदा ‘पर्पल कॅप’ मिळवने सोप नाय गड्या… पर्पल कॅप मिळवण्यासाठी यावर्षी या 5 गोलंदाजामध्ये होऊ शकते काटे कि टक्कर….
इंडियन प्रीमियर लीग 2023 सुरू होण्यासाठी आता फक्त तीन आठवडे उरले आहेत. पण जगातील सर्वात मोठ्या T20 क्रिकेट लीगची क्रेझ आतापासूनच लोकांमध्ये दिसू लागली आहे. BCCI ने IPL (IPL 2023) च्या 16 व्या हंगामातील पहिल्या सामन्यासाठी 31 मार्च ही तारीख निश्चित केली आहे. आणि आज आम्ही तुम्हाला अशा टॉप-5 गोलंदाजां बद्दल सांगणार आहोत जे यावर्षी आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेऊ शकतात. चला जाणून घेऊया यादीत कोण आहेत ते गोलंदाज ..
कुलदीप यादव: भारताचा स्टार फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने गेल्या वर्षी दिल्ली कॅपिटल्ससाठी शानदार गोलंदाजी केली होती. आयपीएल 2022 मध्ये त्याने 14 सामन्यात 21 विकेट घेतल्या. त्यानंतर जेव्हा-जेव्हा त्याला टीम इंडियाकडून खेळण्याची संधी मिळाली तेव्हा त्याने आपल्या देशासाठी अनेक विकेट्स घेतल्या. तथापि, कुलदीप यादव सध्या कमांडिंग फॉर्ममध्ये आहे आणि यावेळी त्याचा आयपीएल 2023 मध्ये सर्वाधिक बळी घेणाऱ्या फलंदाजांच्या यादीत समावेश आहे.
वानिंदू हसरंगा: श्रीलंकेचा स्टार अष्टपैलू खेळाडू वानिंदू हसरंगा आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोरकडून खेळताना दिसणार आहे. त्याने संघासाठी गेल्या वर्षी आयपीएलमध्ये 16 सामन्यांत 26 विकेट घेतल्या होत्या आणि आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा तो दुसऱ्या क्रमांकावर होता. त्यानंतर त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्या संघासाठी चांगली कामगिरी केली आहे. हसरंगा आयपीएल 2023 मध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाजही बनू शकतो.
View this post on Instagram
उमरान मलिक : भारतीय संघाचा युवा गोलंदाज त्याच्या घातक गोलंदाजीसाठी ओळखला जातो. तसेच तो टीम इंडियाचा सर्वात वेगवान गोलंदाज आहे. उमरान सनरायझर्स हैदराबादसाठी भरपूर विकेट काढू शकतो. एसआरएचकडून खेळताना त्याने 14 सामन्यांत 22 विकेट घेतल्या. त्याचवेळी त्याला टीम इंडियाकडून खेळण्याची संधी मिळाली तेव्हा त्याने विकेट्स घेतल्या. आणि यावेळी तो आयपीएल 2023 मध्ये जास्तीत जास्त विकेट घेऊ शकेल अशी आशा आहे.
कागिसो रबाडा : दक्षिण आफ्रिकेचा घातक गोलंदाज कागिसो रबाडा या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. गेल्या वर्षी आयपीएलमध्ये पंजाबकडून खेळताना त्याने 13 सामन्यांत 23 बळी घेतले होते. रबाडा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही अत्यंत चुरशीची गोलंदाजी करत आहे. त्याची कामगिरी पाहता तो यंदाच्या आयपीएल २०२३ मध्ये जास्तीत जास्त विकेट घेऊन पर्पल कॅप ताब्यात घेऊ शकतो.
सॅम करण : इंग्लंडचा युवा अष्टपैलू खेळाडू सॅम करणचाही या यादीत समावेश आहे. मिनी ऑक्शन 2023 मध्ये सॅम करणला पंजाब किंग्सने 18.50 कोटी रुपयांना विकत घेतले आहे. त्याचबरोबर सॅम करण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत आहे. 2022 च्या T20 विश्वचषक स्पर्धेत त्याने एकूण 15 विकेट घेतल्या आणि संघाला चॅम्पियन बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याचबरोबर सॅम यावेळी आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज बनू शकतो. (चेन्नई की मुंबई कोणाचे ओपनर आहेत घातक फलंदाज, पहा येथे)
हे ही वाचा..
रोहितने ODI क्रिकेटमधून कर्णधारपद सोडल्यास केएल राहुल नव्हे तर ‘हा’ खेळाडू होऊ शकतो पुढील कर्णधार
चेतेश्वर पुजाराचा भीम पराक्रम! प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये असा कारनामा करणारा ठरलाय केवळ दुसरा फलंदाज…
Ranji Trophy – सरफराज खानची खेळी व्यर्थ! दिल्लीचा मुंबईवर तब्बल ४२ वर्षांनंतर विजय…