IPL 2023: अखेर प्रतीक्षा संपली..! आयपीएल 2023चे वेळापत्रक जाहीर, या 12 शहरांमध्ये खेळवले जाणार तब्बल 70 सामने…पहा तुमच्या आवडत्या संघाचे सामने कधी?
चाहते आयपीएल 2023 च्या वेळापत्रकाची बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत होते. मात्र चाहत्यांची ही प्रतीक्षा आता संपली आहे. ज्या क्षणाची क्रिकेटप्रेमी वाट पाहत होते तो क्षण आता आला आहे. कारण इंडियन प्रीमियर लीग अर्थात IPL (IPL 2023 शेड्यूल) च्या 16 व्या हंगामाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. आयपीएलच्या आगामी मोसमातील पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि गतविजेता गुजरात जायंट्स यांच्यात होणार आहे. आयपीएल 2023 चे सर्व सामने कधी आणि कुठे खेळले जातील याची सविस्तर माहिती घेऊया?
आयपीएल 2023 31 मार्चपासून सुरू होणार आहे.

चाहत्यांसाठी एक मोठी बातमी येत आहे की, IPL च्या 16 व्या हंगामाचे वेळापत्रक जाहीर झाले आहे.यंदा जगातील सर्वात मोठी लीग IPL 31 मार्च पासून सुरु होणार आहे. आणि त्याचा अंतिम सामना 28 मे रोजी होणार आहे. आयपीएलच्या आगामी मोसमातील पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि गतविजेता गुजरात जायंट्स यांच्यात होणार आहे.
या 12 शहरांमध्ये 70 सामने खेळवले जाणार आहेत
आयपीएलच्या या मोसमात एकूण 70 लीग सामने खेळले जातील, ज्यामध्ये 18 डबल हेडरचा समावेश आहे. शेवटचा लीग स्टेज सामना २१ मे रोजी आहे. 28 मे रोजी अंतिम सामना होणार आहे. आयपीएल 2023 12 शहरांमध्ये आयोजित केले जाईल.
ज्यामध्ये अहमदाबाद, मोहाली, लखनौ, हैदराबाद, बेंगळुरू, चेन्नई, दिल्ली, कोलकाता, जयपूर, मुंबई, गुवाहाटी आणि धर्मशाला येथे आयपीएल सामने आयोजित करण्याची संधी मिळेल.
येथे पूर्ण वेळापत्रक पहा
🚨 NEWS 🚨: BCCI announces schedule for TATA IPL 2023. #TATAIPL
Find All The Details 🔽https://t.co/hxk1gGZd8I
— IndianPremierLeague (@IPL) February 17, 2023
हे ही वाचा..
तिसऱ्या वनडेपूर्वी भारतीय खेळाडूंची महाकालच्या दरबारी हजेरी! रिषभ पंतसाठी केली प्रार्थना…
‘ दोस्त दोस्त ना रहा’,मित्रानेच उमेश यादवला लावला लाखोंचा गंडा; वाचा संपूर्ण प्रकरण