IPL 2023: मुंबई इंडियन्स पुन्हा एकदा चॅम्पियन बनण्यासाठी सज्ज, मुंबई इंडियन्स संघाचा हा विक्रम आहे साक्ष!
आपल्या देशात क्रिकेट खेळाला सर्वाधिक पसंती दिली जाते. आपल्या देशातील अगदी लहान मुलापासून ते वयोवृद्ध लोकांपर्यंत प्रत्येकाला क्रिकेट चे वेड आहे. गेल्या 2 दिवसांपासून आपल्या देशात आयपीएल चा 16 वा सिझन सुरू झाला आहे.

आपल्या देशातील तरुण पिढी मध्ये आयपीएल चे वेड सर्वात जास्त आहे. कित्येक तरुण आयपीएल ची वर्षभर वाट पाहत असतात. त्यातली त्यात म्हणजे मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग या दोन्ही संघाचा सामना या सामन्यादरम्यान तर बऱ्याच वेळी तरुणांमध्ये भांडण तसेच वाद सुद्धा झाले आहेत.
गेल्या सोळाव्या सिझन पर्यंत सर्वात दमदार संघ हा मुंबई इंडियन्स हा राहिलेला आहे. कारण मुंबई इंडियन्स संघाने आतापर्यंत सर्वाधिक आयपीएल मध्ये ट्रॉफी जिंकल्या आहेत. एकूण 16 सिझन मध्ये मुंबई इंडियन्स संघाने 5 वेळा विजेतेपद जिंकले आहे. त्यामुळे यंदा सुद्धा मुंबई इंडियन्स हा संघ विजेता ठरू शकतो असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
मुंबई इंडियन्स संघाबद्दल सांगायचे म्हटले तर मुंबई इंडियन्स संघाच्या नावी अनेक विक्रम आहेत. मुंबई इंडियन्स या संघाने आयपीएलमध्ये आतापर्यंत सर्वाधिक चौकार मारले आहेत. मुंबई संघाने आतापर्यंत 231 सामन्यात 3153 चौकार मारले आहेत. याचबरोबर सर्वाधिक षटकार मारणारा संघ हा मुंबई इंडियन्स च आहे.
मुंबई इंडियन्सच्या विजयाची सर्वात मोठी हमी म्हणजे संघाचा कर्णधार रोहित शर्मा होता परंतु सध्या मुंबई इंडियन्स संघाची सूत्र सूर्यकुमार यादव या आक्रमक फलंदाजाकडे जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. तसेच यंदा मुंबई इंडियन्स संघात अनेक दिग्गज आणि आक्रमक फलंदाज असल्यामुळे यंदाच्या वर्षी आयपीएल चे विजेतेपद मुंबई इंडियन्स जिंकू शकते.