IPL 2024: 5 भारतीय दिग्गज खेळाडू, जे यंदाच्या आयपीएल हंगामात खेळतांना दिसू शकत नाहीत, कुणी दुखापतीमुळे तर कुणी वैयक्तिक कारणामुळे पडणार आयपीएलमधून बाहेर..

IPL 2024: 5 भारतीय दिग्गज खेळाडू, जे यंदाच्या आयपीएल हंगामात खेळतांना दिसू शकत नाहीत, कुणी दुखापतीमुळे तर कुणी वैयक्तिक कारणामुळे पडणार आयपीएलमधून बाहेर..

IPL 2024: इंडियन प्रीमियर लीग 2024 लवकरच सुरू होणार आहे आणि सर्व चाहते या सर्वांत मोठ्या स्पर्धेची आतुरतेने वाट पाहत आहेत.  इंडियन प्रीमियर लीग 2024 चा (IPL 2024) लिलाव 19 डिसेंबर 2023 रोजी दुबईतील कोका-कोला एरिना येथे आयोजित करण्यात आला होता.

 

या लिलावात अनेक महान खेळाडूंवर बोली लावण्यात आली. ऑस्ट्रोलियाच्या खेळाडूंवर तर या लिलावात अक्षरशा पैश्यांची उधळण झाली. त्यांच्या दोन खेळाडूंना 20 कोटीहून अधिक रक्कम देण्यात आली.

IPL 2024 TIMETABLE: आयपीएलच्या सामन्यांची तारीख अखेर समोर, या कालावधीत होणार महासंग्राम,WPL ची तारीख ही समोर..!

एकीकडे सर्वच संघ आयपीएलच्या 17 व्या हंगामाची तयारी करत असतांना. दुसरीकडे मात्र  याच संघांमध्ये असे काही खेळाडू आहेत जे दुखापतग्रस्त आहेत आणि त्यांना इंडियन प्रीमियर लीग 2024 मध्ये खेळणे खूप कठीण दिसतंय. आज आम्ही तुम्हाला अशा पाच क्रिकेटर्सबद्दल सांगणार आहोत जे दुखापतीमुळे IPL 2024 मध्ये खेळताना दिसू शकत नाहीत. चला तर जाणून घेऊया कोण आहेत ते खेळाडू.

IPL 2024 मध्ये खेळतांना नाही दिसू शकत हे स्टार खेळाडू.

 

१- हार्दिक पंड्या (Hardik Pandya)

हार्दिक पांड्या इंडियन प्रीमियर लीग 2024 (IPL 2024) मध्ये मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करताना दिसणार आहे. त्याचा व्यवहार मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्सशी केला आहे. अनुभवी कर्णधार रोहित शर्माच्या जागी हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधारपद का देण्यात आले हे पाहून अनेकांना आश्चर्य वाटले.

हार्दिक पांड्याचे भारतीय संघातील स्थान धोक्यात,हे 5 खेळाडू घेऊ शकतात त्याची संघातील जागा ;रोहित शर्मा मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत..

मात्र  हार्दिक पांड्या गेल्या काही काळापासून क्रिकेटपासून दूर आहे. ICC ODI World Cup 2023 मध्ये बांगलादेश विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात हार्दिक पंड्याला दुखापत झाली होती. तेव्हापासून तो क्रिकेटपासून दूर होता. पांड्या आजूनही पूर्णपणे फिट झालेला नाहीये. मुंबई इंडियन्सला आशा आहे की आयपीएलचे हंगाम सुरु होण्याआधी हार्दिक तंदुरुस्त होऊन मैदानात उतरेल. मात्र पांड्याची एकंदरीत स्थिती पाहता आयपीएलच्या आगामी आवृत्तीत खेळणे त्याच्यासाठी कठीण दिसत आहे.

२- मोहम्मद शमी (Mohmmad Shami)

आयसीसी वनडे विश्वचषक २०२३ मध्ये मोहम्मद शमीने अप्रतिम गोलंदाजी करत विरोधी संघाच्या फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. मात्र, या स्पर्धेनंतर मोहम्मद शमीला दुखापत झाली आणि तो अजूनही पूर्णपणे तंदुरुस्त नाही.

याच कारणामुळे मोहम्मद शमी गेल्या काही काळापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळताना दिसत नाही. जर मोहम्मद शमी आयपीएल 2024 मध्ये खेळला नाही तर, गुजरात टायटन्ससाठी हा एक मोठा धक्का असेल कारण अनुभवी गोलंदाज गुजरात संघातील महत्त्वाच्या वेगवान गोलंदाजांपैकी एक आहे.

३- ऋषभ पंत (Rishbh Pant)

31 डिसेंबर 2022 रोजी क्रिकेटर ऋषभ पंतचा कार अपघात झाला होता. तो गंभीर जखमी झाला होता. म्हणूनच तो आयपीएलह्या मागच्या हंगामात (IPL 2023) मध्ये सुद्धा खेळतांना दिसला नव्हता.

IPL 2024: 5 भारतीय दिग्गज खेळाडू, जे यंदाच्या आयपीएल हंगामात खेळतांना दिसू शकत नाहीत, कुणी दुखापतीमुळे तर कुणी वैयक्तिक कारणामुळे पडणार आयपीएलमधून बाहेर..

पण यावेळी ऋषभ पंत आधीच तंदुरुस्त होत आहे. मात्र अद्याप, ऋषभ पंतच्या गुडघ्यात अजूनही काही समस्या आहे आणि हे बीसीसीआय आणि दिल्ली कॅपिटल्ससाठी अजिबात चांगले नाही. 2023 च्या T20 विश्वचषकापूर्वी BCCI प्रार्थना करत असेल की ,ऋषभ पंत पूर्णपणे तंदुरुस्त होऊन या महत्त्वाच्या स्पर्धेत खेळतांना दिसावा. ऋषभ पंतने तंदुरुस्त न राहता क्रिकेट खेळावे अशी बोर्डाची अजिबात इच्छा नाही आणि म्हणूनच तो इंडियन प्रीमियर लीग 2024 मध्ये खेळताना दिसू शकत नाही.

IND vs ENG 2nd Test: सरफराज खानला संधी मिळेल? दुसऱ्या कसोटीमध्ये रोहित शर्मा संघात करणार मोठा बदल, या 11 खेळाडूंना मिळू शकते संधी..

4- सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav)

सूर्यकुमार यादवची गणना जगातील स्फोटक फलंदाजांमध्ये केली जाते. T20 मध्ये त्याची कामगिरी नेहमीच चांगली राहिली आहे. इतकेच नाही तर सूर्यकुमार यादव आयसीसी पुरुषांच्या फलंदाजी टी-२० क्रमवारीत पहिल्या स्थानावर आहे.

IPL 2024: 5 भारतीय दिग्गज खेळाडू, जे यंदाच्या आयपीएल हंगामात खेळतांना दिसू शकत नाहीत, कुणी दुखापतीमुळे तर कुणी वैयक्तिक कारणामुळे पडणार आयपीएलमधून बाहेर..

सूर्यकुमार यादव इंडियन प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळतो. मात्र, यावेळी सूर्यकुमार यादव दुखापतग्रस्त असून त्याला सावरण्यासाठी अजून थोडा वेळ लागेल. त्यामुळेच तो देखील इंडियन प्रीमियर लीगच्या आगामी आवृत्तीत खेळताना दिसू शकत नाही. असे झाल्यास आयपीएलमधील सर्वांत यशस्वी संघ असलेला मुंबई इंडियन्ससाठी हा एक मोठा धक्का असेल.

5- पृथ्वी शॉ (Pruthvi Show)

इंडियन प्रीमियर लीग 2024 पृथ्वी शॉसाठी खूप महत्त्वाची असणार आहे. कारण अलीकडच्या काळात पृथ्वी शॉ इंडियन प्रीमियर लीगमध्ये चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरला आहे. या युवा फलंदाजाला पुन्हा एकदा भारतीय संघाकडून खेळताना दिसायचे असेल, तर आयपीएल 2024 मध्ये चांगली फलंदाजी करणे त्याच्यासाठी खूप महत्त्वाचे असेल.

IPL 2024: 5 भारतीय दिग्गज खेळाडू, जे यंदाच्या आयपीएल हंगामात खेळतांना दिसू शकत नाहीत, कुणी दुखापतीमुळे तर कुणी वैयक्तिक कारणामुळे पडणार आयपीएलमधून बाहेर..

पृथ्वी शॉने इंडियन प्रीमियर लीग 2023 मध्ये 8 सामन्यांमध्ये 13 च्या वरच्या स्ट्राइक रेटने 106 धावा केल्या. दिल्ली कॅपिटल्सने पृथ्वी शॉचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश केला तरच तो चांगली कामगिरी करू शकेल.

तर मित्रांनो, हे होते ते 5खेळाडू जे जखमी असल्यामुळे यंदाच्या आयपीएल हंगामात खेळण्यास उपलब्ध होऊ शकत नाहीत. वरील सर्व माहिती ही त्यांच्या सध्याच्या मेडिकल रिपोर्ट आणि डॉक्टर्सच्या म्हणण्यानुसार आहे. कदाचित यांच्यापैकी एखादा खेळाडू लवकर फिट देखील होऊन आपल्याला मैदानात खेळतांना दिसू शकेल..


===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

कारकीर्द कितीही वादाची असली तरीही, ‘सनथ जयसूर्या’ खेळाडू जबराटचं होता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *