IPL 2024 Auction: स्मिथ किंवा पॅट कमिन्स नाही तर लिलावात ‘या’ खेळाडूवर लागू शकते आयपीएलच्या इतिहासातील सर्वांत मोठी बोली, आजवरचा सर्वांत महागडा खेळाडू ठरणे निच्छित..

0
25
ad

IPL 2024 Auction:   भारतातील सर्वात मोठा क्रिकेट महोत्सव म्हणजेच आयपीएल पुढील वर्षी मार्च महिन्यात आयोजित करणे अपेक्षित आहे, ज्यामध्ये जास्त वेळ शिल्लक नाही. त्यामुळे बीसीसीआयने आयपीएल 2024 लिलावाची तारीख निश्चित केली आहे, जी 19 डिसेंबर आहे. आणि या लिलावासाठी आयपीएलच्या सर्व संघांनी तयारी केली आहे.

यावेळी, बहुतेक संघांनी आगामी लिलावासाठी खेळाडूंची यादी देखील तयार केली आहे, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियन खेळाडू अव्वल आहे. चला तर मग जाणून घेऊया कोण असा खेळाडू आहे ज्याची सर्व आयपीएल टीम आतुरतेने वाट पाहत आहेत. या खेळाडूला जवळपास सर्वच संघाला कोनत्याही किमतीमध्ये आपल्या संघात सामील करून घ्यायचे आहे.

IPL 2024 Mini Auction: आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच होतंय असं काही, तब्बल एवढ्या खेळाडूंनी ठेवलीय 2 कोटी बेस प्राईज..

IPL 2024 Auction: सर्व संघ IPL 2024 च्या लिलावाच्या तयारीत व्यस्त !

आयपीएल 2024 साठी खेळाडूंचा लिलाव 19 डिसेंबर रोजी आयोजित केला जात आहे, ज्यासाठी सर्व आयपीएल संघांनी तयारी सुरू केली आहे. या लिलावासाठी बहुतेक संघांनी आपली यादी तयार केली आहे, ज्या यादीत त्यांनी एका कांगारू खेळाडूचाही समावेश केला आहे, जो स्टीव्ह स्मिथ किंवा पॅट कमिन्स नसून ट्रॅव्हिस हेड आहे. ज्यावर सर्व संघ करोडोंची बोली लावण्याच्या तयारीत आहेत. काही संघ तर ट्रॅव्हिस हेड वर आयपीएलच्या इतिहासातील आतापर्यंतची सर्वांत मोठी बोली लावायला सुद्धा तयार आहेत.

ODI Records: एकदिवशीय क्रिकेटमध्ये ‘या’ 5 फलंदाजांना संपूर्ण कारकिर्दीमध्ये एकही षटकार ठोकला आला नव्हता,यादीमध्ये एक स्टार भारतीय खेळाडूही सामील.

IPL 2024 Auction:ट्रॅव्हिस हेडवर होणार करोडो रुपयांची बोली!

IPL 2024 Auction: स्मिथ किंवा पॅट कमिन्स नाही तर लिलावात  'या' खेळाडूवर लागू शकते आयपीएलच्या इतिहासातील सर्वांत मोठी बोली, आजवरचा सर्वांत महागडा खेळाडू ठरणे निच्छित..
travis head- yuvakatta

मीडिया रिपोर्ट्समध्ये मिळालेल्या माहितीनुसार, सर्व संघांनी आयपीएल 2024 (IPL 2024) लिलावादरम्यान खेळाडूंवर बोली लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्या सर्व संघांच्या यादीत ट्रॅव्हिस हेडच्या नावाचा समावेश आहे. त्यामुळे त्याची सर्वाधिक महागडी विक्री होणार असल्याचे मानले जात आहे. याची अधिकृत घोषणा झालेली नसली तरी. पण रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की, हेडने 2023 च्या वर्ल्ड कपमध्ये हीच कामगिरी दाखवली होती. त्यामुळे संघ त्याच्यावर बोली लावण्यास उत्सुक आहेत.

२०२३ च्या विश्वचषकात ट्रॅव्हिस हेडने (Travis Head) घातला होता धुमाकूळ.

IPL 2024 Auction: स्मिथ किंवा पॅट कमिन्स नाही तर लिलावात  'या' खेळाडूवर लागू शकते आयपीएलच्या इतिहासातील सर्वांत मोठी बोली, आजवरचा सर्वांत महागडा खेळाडू ठरणे निच्छित..

ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा सलामीचा फलंदाज ट्रॅव्हिस हेडने (Travis Head)२०२३ च्या विश्वचषक स्पर्धेत जोरदार फलंदाजी केली होती, त्यामुळे सर्व संघ त्याच्यावर बोली लावतील हे निश्चित मानले जात आहे. दुखापतीमुळे विश्वचषकातील सुरुवातीचे सामने गमावल्यानंतर हेडने शेवटच्या 6 सामन्यांमध्ये फलंदाजी करताना 54.83 च्या सरासरीने 329 धावा केल्या. या काळात हेडने 2 शानदार शतके आणि 1 अर्धशतकही झळकावले होते. अशा परिस्थितीत आता कोणता संघ त्याला आयपीएल 2024 मध्ये आपल्यात सामील करण्यात यशस्वी होतो हे पाहने रंजक ठरेल.


हेही वाचा:

शुभमन गिल सारा पुन्हा पडले एकमेकांच्या प्रेमात?.. ब्रेकअप नंतर दोघेही पुन्हा एकत्र, फोटो व्हायरल..