IPL 2024 Auction: भारताच्या दोन गोलंदाजावर पैश्याची बारीश, तब्बल एवढे कोटी घातले खिश्यात…

IPL 2024 Auction: भारताच्या दोन गोलंदाजावर पैश्याची बारीश, तब्बल एवढे कोटी घातले खिश्यात...

IPL 2024 Auction: IPL 2024 चा लिलाव दुबईत सुरु झाला आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. 30 वर्षीय कमिन्सचा 20 कोटी 50 लाखांच्या मोठ्या रकमेसह सनरायझर्स हैदराबाद संघात समावेश करण्यात आला आहे. परदेशी खेळाडूंशिवाय भारतीय खेळाडूंची कामगिरीही पाहायला मिळत आहे.

IPL 2024 Auction: हर्षल पटेल झाला पंजाब किंग्सचा हिस्सा.

यावेळीही हर्षल पटेलचा संघात समावेश करण्यासाठी सर्व फ्रँचायझींमध्ये स्पर्धा होती, मात्र पंजाब किंग्ज संघ येथे विजय मिळवण्यात यशस्वी ठरला. 33 वर्षीय अष्टपैलू खेळाडूला पंजाब संघाने 11 कोटी 75 लाख रुपयांची मोठी बोली लावून आपल्या संघात समाविष्ट केले आहे.

IPL 2024 Auction: भारताच्या दोन गोलंदाजावर पैश्याची बारीश, तब्बल एवढे कोटी घातले खिश्यात...

केवळ हर्षल पटेलच नाही तर, टीम इंडियाचा अनुभवी अष्टपैलू शार्दुल ठाकूरवरही भरपूर पैशांचा वर्षाव झाला आहे. पुन्हा एकदा चेन्नई सुपर किंग्ज संघाने 4 कोटींची बोली लावून ठाकूरचा आपल्या ताफ्यात समावेश केला आहे.

हर्षल पटेल आणि शार्दुल ठाकूर यांना आयपीएलमध्ये खेळण्याचा प्रदीर्घ अनुभव आहे. गोलंदाजीसोबतच हे दोन्ही खेळाडू खालच्या फळीत स्फोटक फलंदाजी करण्यातही माहीर आहेत.

हर्षल पटेलने आतापर्यंत आयपीएलमध्ये एकूण 92 सामने खेळले आहेत. दरम्यान, त्याला 89 डावांमध्ये 24.07 च्या सरासरीने 111 यश मिळाले आहे. फलंदाजी करताना त्याने इतक्याच सामन्यांच्या 38 डावांमध्ये 9.83 च्या सरासरीने 236 धावा केल्या आहेत.

IPL 2024 Auction: भारताच्या दोन गोलंदाजावर पैश्याची बारीश, तब्बल एवढे कोटी घातले खिश्यात...

शार्दुल ठाकूरबद्दल बोलायचे झाले ,तर त्याने आतापर्यंत आयपीएलमध्ये एकूण 86 सामने खेळले आहेत. दरम्यान, त्याने 83 डावांत 28.76 च्या सरासरीने 89 यश मिळवले. फलंदाजी करताना त्याने 34 डावात 11.92 च्या सरासरीने 286 धावा केल्या.


हेही वाचा:

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दीपक चहरच्या जागी भारतीय संघात खेळणार ‘आकाश दीप’ कोण आहे? वडील आणि भावाचे निधन, आईने मेहनत करून बनवले क्रिकेटर..

कारकीर्द कितीही वादाची असली तरीही, ‘सनथ जयसूर्या’ खेळाडू जबराटचं होता…

IPL AUCTION 2024: आई शेतमजूर तर बाप बांधकाम मजूर.. आयपीएलच्या मिनी लिलावात बिहारच्या ‘या’ तरुणाची चर्चा; धोनीला मानतो आदर्श..

IPL RECORD: आयपीएलमध्ये ‘या’ 4 फलंदाजांनी शेवटच्या षटकात काढल्यात सर्वाधिक धावा, यादीमध्ये एकमेव विदेशी खेळाडू..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *