IPL 2024 AUCTION: भारताच्या ‘या’ 5 स्टार खेळाडूंवर एकही संघाने नाही लावली बोली, यादीमध्ये एका युवा खेळाडूचाही समावेश..

IPL 2024 AUCTION: भारताच्या 'या' 5 स्टार खेळाडूंवर एकही संघाने नाही लावली बोली, यादीमध्ये एका युवा खेळाडूचाही समावेश..

IPL 2024 AUCTION:आयपीएल 2024 (IPL 2024) साठी लिलाव प्रक्रिया पूर्ण झाली आहे. लिलावादरम्यान सर्व संघ आपले कमकुवत स्थान सुधारताना दिसले. या काळात खेळाडूंना आपल्या ताफ्यात समाविष्ट करण्यासाठी अनेक संघांमध्ये खडतर संघर्षही पाहायला मिळाला. तथापि, असे काही खेळाडू होते ज्यांना संघांनी योग्य मानले नाही.

आयपीएल 2024 च्या लिलावातील पाच मोठ्या खेळाडूंवर एकाही संघाने बोली लावण्यात इंटरेस दाखवला नाहीये. महत्वाच म्हणजेत्यांना लिलावादरम्यान मोठी रक्कम मिळण्याची अपेक्षा होती, परंतु बोली सोडा, त्यांना एकही खरेदीदार सापडला नाही. चला तर जाणून घेऊया कोण आहेत ते खेळाडू.

IPL 2024: या दिवसापासून सुरु होणार आयपीएलचा महासंग्राम, ठिकाण, वेळ, तारीखबद्दल समोर आले मोठे अपडेट्स..

IPL 2024 AUCTION:आयपीएल 2024 च्या मिनी लिलावात हे स्टार खेळाडू राहिले अनसोल्ड.

करुण नायर:  या विशेष यादीत पहिले नाव आहे करुण नायरचे आहे. नायरने भारतीय संघासह आयपीएलमध्येही सहभाग घेतला आहे. यावेळी त्याला कोणत्या ना कोणत्या संघाची साथ नक्कीच मिळेल, अशी अपेक्षा होती, मात्र तसे झाले नाही. 32 वर्षीय नायर यावेळीही विकले गेले नाहीत.

IPL 2024 AUCTION: भारताच्या 'या' 5 स्टार खेळाडूंवर एकही संघाने नाही लावली बोली, यादीमध्ये एका युवा खेळाडूचाही समावेश..

सरफराज खान: सरफराज खान हे सध्या देशांतर्गत क्रिकेटमधील मोठे नाव आहे. गेल्या काही हंगामांपासून तो सातत्याने आयपीएलमध्ये भाग घेत होता, परंतु यावेळी त्याला कोणीही खरेदीदार मिळालेला नाही. सरफराजने आतापर्यंत एकूण 50 आयपीएल सामन्यांमध्ये भाग घेतला आहे. दरम्यान, त्याने 37 डावांमध्ये 22.5 च्या सरासरीने आपल्या बॅटने 585 धावा केल्या आहेत.

मनन वोहरा: मनन वोहरा यांनाही यावेळी कोणत्याही संघाची साथ मिळालेली नाही. त्याची उत्कृष्ट फलंदाजी पाहता काही संघ नक्कीच त्याला आपल्या ताफ्यात सामील करतील अशी अपेक्षा होती, पण दिवसअखेरीस हा निर्णय आश्चर्यचकित करणारा होता. त्याने आयपीएलमध्ये एकूण 56 सामने खेळले आहेत. दरम्यान, त्याने 51 डावात 22.1 च्या सरासरीने आपल्या बॅटने 1083 धावा केल्या आहेत.

इशान पोरेल: इशान पोरेल हा देशांतर्गत क्रिकेटचा उगवता युवा स्टार आहे. तो 20 लाख रुपयांच्या मूळ किंमतीसह लिलावात उतरला होता, परंतु कोणत्याही संघाने त्याच्यात रस दाखवला नाही. पोरेलने आतापर्यंत आयपीएलमध्ये फक्त एकच सामना खेळला आहे. दरम्यान, त्याला एक यश मिळाले आहे.

IPL 2024 AUCTION: भारताच्या 'या' 5 स्टार खेळाडूंवर एकही संघाने नाही लावली बोली, नाही दिसणार मैदानात..

मुरुगन अश्विन: देशांतर्गत क्रिकेटचा अनुभवी फिरकी गोलंदाज मुरुगन अश्विनलाही यावेळी कोणी खरेदीदार मिळालेला नाही. मुरुगनने 20 लाखांची मूळ किंमत घेऊन मैदानात उतरला होता. मुरुगन अश्विनला आयपीएलमध्ये भाग घेण्याचा प्रदीर्घ अनुभव आहे. येथे 44 सामने खेळताना त्याने 44 डावात 33.2 च्या सरासरीने 35 विकेट्स घेतल्या आहेत.


हेही वाचा:

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दीपक चहरच्या जागी भारतीय संघात खेळणार ‘आकाश दीप’ कोण आहे? वडील आणि भावाचे निधन, आईने मेहनत करून बनवले क्रिकेटर..

कारकीर्द कितीही वादाची असली तरीही, ‘सनथ जयसूर्या’ खेळाडू जबराटचं होता…

IPL AUCTION 2024: आई शेतमजूर तर बाप बांधकाम मजूर.. आयपीएलच्या मिनी लिलावात बिहारच्या ‘या’ तरुणाची चर्चा; धोनीला मानतो आदर्श..

IPL RECORD: आयपीएलमध्ये ‘या’ 4 फलंदाजांनी शेवटच्या षटकात काढल्यात सर्वाधिक धावा, यादीमध्ये एकमेव विदेशी खेळाडू..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *