IPL 2024 AUCTION: काही दिवसापर्यंत करायचा ‘माळी’ म्हणून काम, आयपीएल लिलावात उतरला आणि झाला करोडपती. या खेळाडूच्या संघर्षाची कहाणी ऐकून येईल डोळ्यात पाणी..

 IPL 2024 AUCTION: ऑस्ट्रेलियाचा स्पेन्सर जॉन्सन गेल्या वर्षापर्यंत ‘लँडस्केप’ माळी म्हणून काम करत होता पण दुबईतील इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) लिलावात गुजरात टायटन्सने 10 कोटी रुपयांना विकत घेतल्यानंतर त्याच्या आईच्या चेहऱ्यावरएकच हसू पसरले आहे. एक काळ असा होता की जॉन्सनची क्रिकेट कारकीर्द संपेल असे वाटत होते. मात्र या लिलावाने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीला एकद पुन्हा जिवंत केल्याचं, त्याच म्हणने आहे.

 IPL 2024 AUCTION: काही दिवसापर्यंत करायचा 'माळी' म्हणून काम, आयपीएल लिलावात उतरला आणि झाला करोडपती. या खेळाडूच्या संघर्षाची कहाणी ऐकून येईल डोळ्यात पाणी..

 IPL 2024 AUCTION: लिलावानंतर जॉन्सन काय म्हणाला?

जॉन्सनने पत्रकारांना सांगितले, ‘आठ महिन्यांपूर्वी माझ्याकडे कोणताही राज्य क्रिकेट करार किंवा बिग बॅश करारही नव्हता. मी लँडस्केपवर झाडे लावण्याचे काम करत होतो. त्यामुळे 18 महिन्यांनंतर परिस्थिती नक्कीच बदलली आहे. ‘2017 मध्ये दक्षिण ऑस्ट्रेलियासाठी त्याच्या व्यावसायिक पदार्पणादरम्यान, त्याच्या पायात स्ट्रेस फ्रॅक्चर झाला ज्यामुळे तो तीन वर्षे क्रिकेटपासून दूर राहिला आणि नंतर त्याचा करार गमावला.

 IPL 2024 AUCTION: जॉन्सनने केलंय बिग बॅश लीगमध्ये पदार्पण

शस्त्रक्रिया आणि ‘पुनर्वसन’ नंतर, या डाव्या हाताच्या वेगवान गोलंदाजाने 2022 मध्ये दक्षिण ऑस्ट्रेलियाशी पुन्हा करार केला आणि यावर्षी जानेवारीमध्ये ब्रिस्बेन हीटसाठी बिग बॅश लीगमध्ये पदार्पण केले.

गेल्या बिग बॅश लीग सीझनमध्ये या 28 वर्षीय वेगवान गोलंदाजाने ताशी 150 किमी वेगाने गोलंदाजी करून सर्वांना आकर्षित केले. माजी भारतीय वेगवान गोलंदाज आशिष नेहराच्या प्रशिक्षक असलेल्या IPL फ्रँचायझीने त्याला विकत घेतले, ज्यामुळे तो गुजरात टायटन्सच्या राशिद खान नंतरचा दुसरा सर्वात महागडा खेळाडू बनला.

‘द हंड्रेड’मध्ये खेळल्यानंतर जॉन्सनने राष्ट्रीय निवडकर्त्यांचे लक्ष वेधून घेतले आणि ऑस्ट्रेलियाकडून खेळण्यासाठी त्याची निवड झाली. त्याने ऑगस्टमध्ये इंदूरमध्ये भारताविरुद्ध एकमेव एकदिवसीय सामना खेळला ज्यामध्ये त्याने आठ षटकांत 61 धावा दिल्या परंतु एकही विकेट घेऊ शकला नाही. त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याचे दोन्ही टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले.

 IPL 2024 AUCTION: काही दिवसापर्यंत करायचा 'माळी' म्हणून काम, आयपीएल लिलावात उतरला आणि झाला करोडपती. या खेळाडूच्या संघर्षाची कहाणी ऐकून येईल डोळ्यात पाणी..

आयपीएलचा किफायतशीर करार मिळणे हा एक विशेष क्षण असल्याचे जॉन्सनने सांगितले, परंतु त्याच्या आईच्या चेहऱ्यावरील हास्य पाहून अधिक समाधान मिळाले. बिग बॅश लीगच्या सामन्यापूर्वी जॉन्सन म्हणाला,

अ‍ॅडलेडमधील  माझ्या आईच्या चेहऱ्यावरचे हास्य पाहून चांगले वाटले. हा केवळ माझ्यासाठीच नाही तर माझ्या संपूर्ण कुटुंबासाठी आनंदाचा क्षण आहे. हे अगदी खास आहे.

 

आता या हंगामात तो गुजरात साठी कशी कामगिरी करतो, हे पाहणे रंजक ठरणार आहे.


हेही वाचा:

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दीपक चहरच्या जागी भारतीय संघात खेळणार ‘आकाश दीप’ कोण आहे? वडील आणि भावाचे निधन, आईने मेहनत करून बनवले क्रिकेटर..

कारकीर्द कितीही वादाची असली तरीही, ‘सनथ जयसूर्या’ खेळाडू जबराटचं होता…

IPL AUCTION 2024: आई शेतमजूर तर बाप बांधकाम मजूर.. आयपीएलच्या मिनी लिलावात बिहारच्या ‘या’ तरुणाची चर्चा; धोनीला मानतो आदर्श..

IPL RECORD: आयपीएलमध्ये ‘या’ 4 फलंदाजांनी शेवटच्या षटकात काढल्यात सर्वाधिक धावा, यादीमध्ये एकमेव विदेशी खेळाडू..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *