IPL 2024 CSK New Captain: आयपीएल 2024 च्या एक दिवस आधी बदलला चेन्नईचा कर्णधार, धोनी ऐवजी आता हा खेळाडू करणार नेतृत्व..!

IPL 2024 CSK New Captain: आयपीएल 2024 च्या एक दिवस आधी बदलला चेन्नईचा कर्णधार, धोनी ऐवजी आता हा खेळाडू करणार नेतृत्व..!

ताज्या बातम्या आणि अपडेट्स Whattsapp वर मिळवण्यासाठी जॉईन करा: Whatsapp Group

=======

IPL 2024 Csk New Captain: IPL 2024 पूर्वी चेन्नई सुपर किंग्सने मोठा निर्णय घेतला आहे. चेन्नईने माजी भारतीय फलंदाज महेंद्रसिंग धोनीकडून कर्णधारपद काढून घेतले आहे. धोनी आयपीएल 2024 मध्ये संघाचे नेतृत्व करताना दिसणार नाही. आता चेन्नईचा स्फोटक फलंदाज रुतुराज गायकवाड याला संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे.

अशा परिस्थितीत गायकवाड आयपीएल 2024 मध्ये चेन्नईचे नेतृत्व करताना दिसणार आहे. रुतुराजने 2019 मध्ये चेन्नईकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले. त्याने आयपीएलमध्ये आतापर्यंत एकूण 52 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने आपल्या बॅटने 1797 धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे चेन्नईकडून खेळताना त्याने शतकी खेळीही खेळली आहे. गायकवाडच्या नावावर आयपीएलमध्ये 14 अर्धशतके आहेत.

रुतुराज  गायकवाड ठरला चेन्नई सुपर किंग्सचा चौथा कर्णधार!

रुतुराज गायकवाड त्याच्या झंझावाती फलंदाजीसाठी ओळखला जातो. त्याने अनेक सामने स्वबळावर जिंकले आहेत. याच कारणामुळे सीएसकेने गायकवाड यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे.  रुतुराज सीएसकेचा कर्णधार करणारा चौथा खेळाडू ठरला आहे. त्याच्या आधी स्टार खेळाडू सुरेश रैना आणि अष्टपैलू रवींद्र जडेजा यांनीही चेन्नईचे नेतृत्व केले आहे. अशा स्थितीत गायकवाड यांच्यावर एवढा मोठा सट्टा खेळणे चेन्नईला कितपत फायदेशीर ठरते, हे पाहायचे आहे.

सीएसके आणि आरसीबी यांच्यात होणार आयपीएल 2024चा सलामीचा सामना

22 मार्चपासून आयपीएल 2024 सुरू होत आहे. या मोसमातील स्पर्धेतील पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होणार आहे. चेन्नईतील चेपॉक येथे हा सामना होणार आहे. याबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे.

IPL 2024 CSK New Captain: आयपीएल 2024 च्या एक दिवस आधी बदलला चेन्नईचा कर्णधार, धोनी ऐवजी आता हा खेळाडू करणार नेतृत्व..!

एमएस धोनीच्या चाहत्यांनाही आयपीएल 2024 बद्दल खूप उत्सुकता होती, पण टूर्नामेंट सुरू होण्यापूर्वी धोनीच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. अशा परिस्थितीत गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली चेन्नईचा संघ कशी कामगिरी करतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.


==

आमचे ईतर लेख आणि ट्रेंडीग बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *